शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची 40 टक्के आवक घटली

By admin | Updated: June 1, 2017 16:08 IST

लिलाव झाला : दुस:या दिवसापासून जाणवणार परिणाम

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1 - कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी शेतक:यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्यात दिवशी जळगावात येणा:या भाजीपाला, फळ, धान्य यांच्या आवकवर परिणाम ही आवक 40 टक्क्याने घटली आहे. आज संपामुळे भाजीपाला काढला  जाणार नसल्याने शुक्रवारपासून याचा अधिक परिणाम जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज आलेल्या 60 टक्के मालाचा पूर्णपणे, शांततेत लिलाव झाला व बाजार समितीतील कामकाज सुरळीत सुरू होते. 
पहिल्यात दिवशी 40 टक्के आवक घटली
संपाच्या पहिल्याच दिवशी जळगाव बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळ, धान्य यांची 40 टक्क्याने आवक घटली. संपाच्या पाश्र्वभूमीवर राज्यात इतर भागात तोडफोड होऊ लागल्याने भाजीपाल्याची अनेक वाहने जळगावात आलीच नाही. त्यामुळे केवळ 60 टक्के आवक राहिली. 
भाववाढ
आवक कमी होताच बाजार समितीपासून भाववाढ होण्यास सुरुवात झाली. दररोजच्या लिलावापेक्षा 10 टक्क्याने भाव वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 
माल घेण्यासाठी झुंबड
आवक घटल्याने किरकोळ विक्रेत्यांनी माल खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सर्व प्रकारचा भाजीपाला आपल्याला मिळाला पाहिजे, यासाठी सर्वच ठिकाणी झुंबड पडताना दिसून आली. 
लिलाव सुरळीत
जेवढा माल आला त्याचा पूर्णपणे शांततेत लिलाव झाला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. सकाळर्पयत चालणारा भाजीपाल्याचा लिलाव झाल्यानंतर कांदे, बटाटे यांचाही लिलाव सुरळीत झाला. 
धान्याचीही आवक सुरू
बाजार समितीतील धान्य बाजारावरही परिणाम होऊन त्याचीही आवक 40 टक्क्याने घटली. मात्र इतर शेतकरी आणत असल्याने  काही प्रमाणात आवक सुरू होती.