लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सप्तरंग मराठी चॅनेल जळगावतर्फे जळगाव गौरव पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात जळगावात पार पडला. कोविड काळात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी तसेच मराठी अभिनेते शशांक केतकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी श्याम वाणी, किरण पातोंडेकर, नयन गुजराती, पंकज कासार आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उमा बागुल व संजय दुसाने यांनी केले.
कार्यक्रमात संघपाल तायडे व मानसी अडवणी यांनी गीत सादर केले, तर ऐश्वर्या मोरे यांनी कविता सादर केली.
यांचा सन्मान
डॉ. नीलेश चांडक, डॉ. राहुल महाजन, सोनाली महाजन, तेजस राणे, परवेज देशपांडे, जि. प. सदस्या पल्लवी सावकारे, आनंद ठाकरे, संघपाल तायडे, विनोद अहिरे, ॲड. संजय राणे, पत्रकार सचिन जोशी, आनंद सुरवाडे, सुनील चौधरी, गणेश सुरसे, प्रा. जे.आर. चौधरी, अर्चना सूर्यवंशी, भारती काळे, महेश व मनीष चिरमाडे, टेनू बोरोले, अभिजित पाटील, भाग्यश्री शर्मा, सुनील भंगाळे, प्रमोद विसपुते आदींचा सन्मान झाला.