शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कजर्माफीसाठी जळगावात अर्धनग्न मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 16:44 IST

भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवारी अर्धनग्न मोर्चाद्वारे

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 31 - छत्रपती शिवाजी महाराज यांची शेतक:यांसाठी स्वतंत्र नीती होती. त्यांच्या काळात शेतकरी सुखी होता. पण आता अवस्था बिकट आहे. आपणही (जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर) राजे आहात.. आपण आम्हाला छत्रपतींच्या काळासारखे सुखी, आनंदी करा, असे साकडे भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे  पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवारी अर्धनग्न मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना घातले. कजर्माफी मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावेत यासाठी हा अर्धनग्न मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.  शर्ट काढून अर्धनग्न स्वरुपातील  शेतकरी सहभागी झाले. 11.40 वाजता  भर उन्हात  हा मोर्चा निघाला. त्यात सहभागी झालेले शेतकरी उत्स्फूर्तपणे चालत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचले. मोर्चात पाचोरा, जामनेर, एरंडोलसह नंदुरबार, धुळे, नगर येथील काही शेतकरी सहभागी झाले. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील शेतक:यांचा अधिक सहभाग होता. दुपारी शिवतीर्थ मैदानापासून मोर्चा निघाला. उत्पादन शुल्क कार्यालय, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक व पुढे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा गेला. नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले. विजयसिंग परदेशी, रवी पवार, नारायण पाटील, शुभम पाटील, दीपक पाटील, ऋतीक पाटील, अण्णा राजपूत, गौरव राजपूत आदी सहभागी झाले. मागील नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी यांना कजर्माफी व इतर विषयांचे निवेदन दिले. नंतर डिसेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले, पण त्याची दखल घेतली नाही, अशी तक्रार शेतक:यांनी केली. आपण राजे आहात.. आपण आम्हाला सुखी करा, अशी मागणी या शेतक:यांनी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे केली. आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर पुढे आंदोलन तीव्र करू. ट्रॅक्टरमध्ये माती आणून ती शहरातील मुख्य मार्ग, महामार्गावर टाकू. चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला.