शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:16 IST

प्रोत्साहनपर अनुदान नाही, नियमित कर्जफेड करावी की नाही?

जळगाव : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना म्हणजे ‘एकाला न्याय, दुसºयावर अन्याय’ अशीच असून नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांनी कोणाकडे न्याय मागावा, असा सवाल जिल्ह्यातील शेतकºयांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना शेतकºयांनी निवेदन पाठविले असून कर्जमाफी म्हणजे सरकारचे चुकीचे धोरण असल्याचीही टीका या शेतकºयांनी केली आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून थकबाकीदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. मात्र जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यावर हा अन्याय असल्याच्या भावना शेतकºयांमध्ये निर्माण होऊन एकाला न्याय, दुसºयावर अन्याय होत असल्याचा आरोप शेतकºयांनी निवेदनाद्वारे केला आहे....तर सर्वच कर्जबाजारी होतीलनियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांवर अन्याय होत असेल तर कोणताही शेतकरी कर्जाची रक्कम भरणार नाही. या चुकीच्या धोरणामुळे सर्वच शेतकरी कर्जबाजारी होतील, अशी भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनावर महेश माणिकराव मराठे, ज्ञानेश्वर कौतीक शिंदे, मनोज तुकाराम पाटील, जितेंद्र खिंवसरा, शांताराम कोळी, शेख इसा शेख मुसा, हसन कुरेशी, महेबूब खा पठाण, रोहन महाजन यांच्यासह अन्य शेतकºयांच्या सह्या आहेत.कर्जमाफी नको, अल्प व्याज दराच्या योजनेची अंमलबजावणी करादरम्यान, शेतकºयांना कर्जमाफीची सवय लावून त्यांना कर्जबाजारी करू नका तर शेतकºयांसाठी चार टक्के व्याजदराने तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करा, अशी मागणी शिंदाड, ता. पाचोरा येथील शेतकरी शंकर फकिरा यांनी केली आहे.

प्रोत्साहनपर अनुदानाचे काय झाले?थकबाकीदार शेतकºयांना दोन लाखाची कर्जमाफी देताना नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र ते अजूनही पदरात पडले नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर ते मिळण्याची शाश्वती काय, असा सवाल शेतकºयांनी उपस्थित केला आहे. नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना न्याय द्यायचा असेल तर त्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.