शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात आला इराकी कांदा, घरगुती वापरात मात्र वांंधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:07 IST

एका कांद्याचे वजन अर्धा ते पाऊण किलो

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांच्या डोळ््यात पाणी आणणाऱ्या भारतीय कांद्याला पर्याय म्हणून इराकमधून कांद्याची आयात करण्यात आली असली तरी तो घरगुती ग्राहकांच्या पचनी पडलेला नाही. एकाच कांद्याचे वजन अर्धा ते पाऊण किलो असल्याने तो एकदा चिरला की पुन्हा वापरणे शक्य होत नसल्याने त्याची केवळ हॉटेल चालकांकडून खरेदी केली जात आहे. या इराकी कांद्याची किंमत ३० ते ४० रुपये प्रती किलो अर्थात निम्म्याने कमी असली तरी तो परवडणारा नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतीय कांद्यावरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागत आहे.यंदा कांद्याचे भाव प्रचंड वाढून तो हॉटेलसह घरातीलही ताटातून कांदा गायब झाला आहे. ८० रुपये प्रती किलोवर पोहचलेल्या कांद्याने सर्वांच्या डोळ््यात पाणी आणले. देशभरात हीच स्थिती असल्याने दररोज स्वयंपाक घरातील आवश्यक घटक असलेल्या कांद्याने सर्वांचाच वांधा केला. देशातील कांद्याचे भाव नियंत्रणात यावे व सर्वांना कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारने इराकमधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला व इराकमधून कांद्याची आयात सुरू झाली.जळगावात दररोज १०० ते १५० गोणीदेशात या इराकी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर जळगावच्या बाजारपेठेतही तो दाखल झाला आहे. जळगावात दररोज या कांद्याच्या १०० ते १५० गोण्या (३५ ते ४० किलोची एक गोणी) येत आहेत. बाजार समितीमध्ये मात्र येणाºया फळ-भाज्यांमध्ये हा कांदा अद्याप लिलावासाठी आलेला नाही. बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातील अथवा मराठवाड्यातून येणाºया शेतकऱ्यांकडून फळ-भाज्यांची खरेदी केली जाते.भाव जवळपास निम्म्याने कमीबाजारात भारतीय कांदा ५० ते ८० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे तर इराक मधून आलेल्या कांद्याचे दर ३० ते ४० रुपये प्रती किलो आहेत. असे असले तरी या कांद्याची खरेदी घरगुती ग्राहकांकडून केली जात नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.वजनाला भारीइराकी कांदा खरेदी करायचा म्हटल्यास एका किलोमध्ये दोन ते तीनच कांदे बसतात. त्यामुळे तो खरेदी केला तरी घरी वापरणे शक्य होत नाही. कारण कांदा एकदा चिरला की तो लगेच वापरावा लागतो. त्यामुळे चिरलेला कांदा घरात ठेवताही येत नाही, पर्यायाने तो वायाच जातो. त्यामुळे कमी किंमतीत खरेदी करूनही तो न परवडणाराच ठरत आहे.हा कांदा वजनामुळे न परवडणारा तर आहेच, सोबतच त्याची चवही भारतीय कांद्याच्या तोडीची नसल्याने त्याला घरगुती ग्राहकांकडून पसंती दिली जात नसल्याचे चित्र आहे.हॉटेल चालक व इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना भाजी तसेच खाद्य पदार्थांमध्ये कांद्याची ग्रेव्ही व मसाल्यासाठी कांदा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यामुळे त्यांनाच हा कांदा परवडणारा असल्याने त्यांच्याकडून या कांद्याची खरेदी केली जात आहे.- नीलेश भोळे, भाजीपाला व्यावसायिक, जळगाव.इराकचा कांदा बाजारात आला आहे. त्याचे भाव कमी असले तरी वजन जास्त असल्याने त्याची हॉटेल चालकांकडून खरेदी केली जात आहे. घरगुती ग्राहकांकडून मात्र त्यास पसंती नाही.- प्रशांत माळी, कांदा व्यापारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव