शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सधन व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळू नये

By admin | Updated: April 19, 2017 16:24 IST

सुप्रिया सुळे : नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याशी संवाद

 जळगाव,दि.19- मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. आरक्षण देत असताना  सधन किंवा आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींना वगळावे.. पण जे आर्थिक दुर्बल आहेत.. त्यांना आरक्षणाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल, असे म्हटले होते. त्यांचे आश्वासन कुठे गेले, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात उपस्थित केला. 

यावेळी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्करराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, बी.बी.पाटील आदी व्यासपीठावर होते. 
 
जुमलो की सरकार
लोकसभेच्या कामकाजादरम्यान पंतप्रधानांचे डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप असे अनेक मुद्दे भाषणात येतात. रोज नवीन नवीन ऐकायला मिळते. ही सरकार फक्त जुमलोकी सरकार असल्याची टीका खासदार सुळे यांनी केली. डिजिटल कार्यक्रमासंबंधी विद्याथ्र्यानी उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर त्या बोलत होत्या. 
समान प्राथमिक शिक्षण धोरण हवे
माझी मुले मुंबईत चांगल्या विद्यालयात  शिक्षण घेतात. पण जि.प.च्या शाळा, दुर्गम भागात असेच  शिक्षण, सुविधा नाहीत. हीच बाब लक्षात घेता आरक्षणाचा नियम लागू आहे. परंतु शिक्षण क्षेत्रातील आरक्षणाचे महत्त्व कमी करायचे असेल तर समान प्राथमिक शिक्षणाचे धोरण असावे.  जि.प.च्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा. नेत्यांचे दौरे असले की फक्त जि.प.च्या शाळांमध्ये रांगोळ्य़ा, सफाई होते. एरवीदेखील तसे चांगले चित्र या शाळांमध्ये हवे, असेही सुळे यांनी सांगितले. अनेक विद्यार्थी फक्त आरक्षणामुळे अधिक गुण असताना मागे पडतात. मेरिटच्या आधारावर शिक्षण व्यवस्था का नाही, असा मुद्दा एका विद्याथ्र्याने मांडला असता सुळे यांनी आपले मत मांडले.