शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व नर्सची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 16:00 IST

भुसावळ : तळवेल येथील पालकाच्या तक्रारीची दखल

 ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.19 - तालुक्यातील  तळवेल येथील दुर्गेश सागर पाटील या मुलाच्या मृत्यू प्रकरणी वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी यांची चौकशी भुसावळ प्रातांधिकारी यांच्याकडे सुरु झाली आहे.
प्रातांधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या 29 मे रोजी  भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील दुर्गेश सागर पाटील या मुलाचा साप चावल्याने मृत्यू झाला. साप चावला त्यावेळी दुर्गेश याला जवळील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बालहक्क आयोगाकडे तक्रार
दुर्गेशचे वडील सागर पाटील यांनी दवाखान्यात डॉक्टर नसल्याने व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी नसल्याने दुर्गेशचा मृत्यू झाला. त्याला डॉक्टर जबाबदार आहेत याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे केली. आयोगाचे यशवंत जैन यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी चौकशीसाठी हे प्रकरण जळगावचे  जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविले. जिल्हाधिकारी यांच्याकडून हे प्रकरण भुसावळचे प्रातांधिकारी डॉ. चिंचकर यांच्याकडे चौकशीसाठी आले आहे. त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांची चौकशी झाली आहे. घटना घडली त्यावेळी ते रजेवर होते, अशी माहिती त्यांनी चौकशीत दिल्याचे डॉ.चिंचकर यांनी दिली.