शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

महिलांच्या सरासरी मतदानात वाढ

By admin | Updated: February 17, 2017 23:35 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : 6 लाख 35 हजार महिलांनी बजावला हक्क

जळगाव : ‘चूल आणि मूल’ यामध्ये अडकलेल्या महिला समर्थपणे आपल्या हिताचा निर्णय घेऊ लागल्या आहेत. गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाभरातील 6 लाख 35 हजार 455 महिलांनी स्वत:हून पुढे येत गट आणि गणाचे प्रतिनिधित्व करणा:या उमेदवारांना मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या सरासरी मतदानात वाढ दिसून आली.जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान झाले. सकाळपासून महिला मतदारांचा मोठा उत्साह होता.चाळीसगावात व जामनेरात सर्वाधिक मतदानमहिला मतदारांचा सर्वाधिक उत्साह हा जामनेर व चाळीसगाव तालुक्यात होता. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 70 हजार 173, तर जामनेर तालुक्यात 67 हजार 996 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.साडेअकरानंतर महिला मतदान केंद्रावरसकाळी घरातील धुणे, भांडी, स्वयंपाकाची कामे महिलांना करावी लागत असल्याने सकाळी साडेसात ते साडेअकरा यादरम्यान जिल्हाभरात केवळ 61 हजार 427 महिलांनी मतदान केले होते. त्यानंतर घरातील बहुतांश कामे आटोपल्यानंतर 12 वाजेच्या सुमारास महिलांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली. 11.30 वाजेर्पयत 1 लाख 85 हजार 77, तर दुपारी 1.30 र्पयत तीन लाख 27 हजार 12 महिलांनी मतदान केले. दुपारी साडेतीन वाजेर्पयत 4 लाख 93 हजार 736 महिलांनी मतदान केले.भुसावळ, भडगावमध्ये अनास्थाअन्य तालुक्यांच्या तुलनेत भुसावळ व भडगावमधील महिलांमध्ये मतदानाबाबत काही प्रमाणात उत्साह कमी दिसून आला. भुसावळ तालुक्यातील 48 हजार 973 महिला मतदारांपैकी केवळ 24 हजार 492 महिला मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांर्पयत आहे. भडगावमध्येदेखील काही प्रमाणात कमी उत्साह दिसून आला.तालुकानिहाय मतदानाची स्थितीतालुका    स्त्री मतदार        मतदानचोपडा    82817        51318यावल    69072        41443रावेर    86296        57438मुक्ताईनगर    57909       36465बोदवड    23754       15626भुसावळ    48973       24492जळगाव    78462       51791धरणगाव    48881      31495अमळनेर    73427      43187पारोळा    58902      37886एरंडोल    45027      27917जामनेर    105850       67966पाचोरा    81338       49748भडगाव    46678       28520चाळीसगाव    114715       70173एकूण     1022101       635455