शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे वाढल्या रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:55 IST

ऑनलाईन प्रक्रियेमुळे लेखापालांना मागणी : प्रत्यक्ष काम करणा:यांची मात्र चणचण

ठळक मुद्देऑनलाईन प्रक्रियेमुळे लेखापाल आवश्यकव्यापा:यांकडे संधीपूर्णवेळ लेखापालांना मागणी वाढली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11 -  वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीत प्रत्येक व्यापा:याला आपल्या व्यवहाराची नोंद ठेऊन त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. यामुळे लेखापालांची (अकाऊंटंट) मागणी मोठय़ा प्रमाणात वाढून रोजगाराच्याही संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतलेले अनेक जण असले तरी प्रत्यक्ष काम करणा:यांची चणचणही भासत असल्याचे चित्र आहे. जीएसटीमुळे अनेक वस्तूंचे भाव कमी जास्त झाले असले तरी त्याचा एक मोठा सकारात्मक परिणाम म्हणजे यातून रोजगाराच्या संधीही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन प्रक्रियेमुळे लेखापाल आवश्यकपूर्वी व्यापा:यांकडे व्यवहाराच्या नोंदी ‘मॅन्यूअली’ केल्या जात होत्या. मात्र आता जीएसटीची नोंदणी झाल्याने सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. पूर्वी नोंदी नाही केल्या तरी धकून जात होते. मात्र आता सर्व डेटा तयार करून रिटर्नही ऑनलाईन भरावे लागत आहे. त्यामुळे व्यापा:यांकडे लेखापालांना मोठी मागणी आहे. 15 हजार व्यापा:यांकडे संधीजळगाव शहरात एकूण 25 हजार व्यापारी आहेत. यामध्ये जीएसटी नोंदणी केलेले जवळपास 12 ते 15 हजार व्यापारी आहेत. या सर्वाकडे आता लेखापाल आवश्यक झाले आहेत. त्यात व्यापाराचे स्वरुप पाहून कोठे एक तर कोठे त्यापेक्षा जास्त लेखापालांना मागणी आहे. एका  व्यापा:याकडे सरासरी दोन लेखापाल जरी आवश्यक असल्यास 30 हजार लेखापालांना रोजगाराच्या संधी आहेत.पूर्णवेळ लेखापालांना मागणी वाढलीपूर्वी व्यापा:यांकडे हिशेबाच्या नोंदणी ठेवण्यासाठी लेखापालांना काम दिले जात असे. त्यात ते वेगवेगळ्य़ा व्यापा:यांकडे जाऊन हे काम करून देत असे. मात्र आता जीएसटीमध्ये एका व्यापा:याला महिन्यात तीन रिटर्न भरावे लागत असल्याने पूर्णवेळ (फूल टाईम) लेखापानांना मागणी वाढली आहे.  नोंदणी नसल्यास व्यापार ठप्पजीएसटीच्या या प्रक्रियेत नोंदणी केल्यानंतर सर्व नोंदी वेळीच दाखल कराव्या लागणार आहे. हे टाळण्यासाठी नोंदणी केलीच नाही तर जीएसटी  क्रमांकाशिवाय विक्रेते संबंधिकांकडून माल खरेदी करणारच नाही व व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही नोंदणी करणे व लेखापाल कडून सर्व प्रक्रिया करून घेणे गरजेचे झाले आहे.लेखापालांची चणचणव्यापा:यांकडे हे काम वाढले असले तरी लेखापालांची चणचण भासत आहे. त्यात वाणिज्य शाखेचे शिक्षण झाले असले तरी प्रत्यक्ष लेखापालचे काम करणे अनेकांना जमत नसल्याने लेखापालच्या शिक्षणासह ही सिस्टीम चालविता येणेही गरजेचे आहे.असेलेखापालखूपकमीअसल्याचेसांगितलेजातआहे.सी.ए.कडेही येणा:यांच्याही अडचणीअनेक लेखापाल सी.ए.कडे लेखापालचे काम शिकायला येतात. मात्र प्रत्यक्ष त्यांना काम दिले तर ते करू शकत नाही. कारण शिक्षण घेताना प्रत्यक्ष काम कसे चालते, याचे प्रात्यक्षिक न केल्याने या अडचणी येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परिणामी जीएसटीमुळे आता अभ्यासक्रमातही प्रत्यक्ष कामाच्या  स्वरुपातील शिक्षण द्यावे लागणार आहे.लहान गावांमध्ये मोठय़ा अडचणीशहरात प्रशिक्षित लेखापाल तर मिळून जातात मात्र गावांमध्ये अधिक अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तेथे लेखापाल उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिकांना अडचणी येत आहे. व्यापा:यांना झळया सर्व नोंदी ठेवण्यासाठी लेखापाल आवश्यक झाल्याने त्यांच्या मोबदल्याची झळ थेट व्यापा:यांना बसणार आहे. 

जीएसटीमुळे सर्व नोंदी ऑनलाईन कराव्या लागत असल्याने लेखापालांना (अकाऊंटंट) मागणी वाढली आहे. व्यापा:यांकडून याची जास्त मागणी आहे. मात्र प्रत्यक्ष हे काम करणा:यांची संख्या खूप कमी असल्याने त्यांची चणचण आहे. - सी.ए. अनिल शाह.

जीएसटीच्या कामासाठी व्यापा:यांना लेखापाल आवश्यक झाले आहेत. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. व्यापारी आता पूर्णवेळ लेखापाल ठेवण्याच्या तयारीत आहेत. - प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन.