शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आरामदायी प्रवासासाठी रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने झुकझुक गाडीचे विस्तारीकरण करून प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी सुविधा वाढविल्या ...

भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने झुकझुक गाडीचे विस्तारीकरण करून प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी सुविधा वाढविल्या आहेत. गाडी संख्या सुधारित संरचना व विशेष शुल्कासह उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुदत वाढविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये - पुणे-गोरखपूर विशेष- ०१३२९ पुणे- गोरखपूर विशेषच्या सेवा दि.१, ३, ५, ८, १०, १२ व १५ जूनपर्यंत ०१३३० गोरखपूर - पुणे विशेष सेवा दि.३, ५, ७, १०, १२, १४ व १७ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

पुणे-दानापूर विशेष-०१३३१ पुणे-दानापूर विशेष सेवा दि. ४, ७, ११ व १४ जूनपर्यंत आणि ०१३३२ दानापूर-पुणे विशेष अतिजलद सेवा दि.५, ८, १२ व १५ जूनपर्यंत.

पुणे-दरभंगा विशेष- ०१३३३ पुणे-दरभंगा विशेषच्या सेवा दि. ३ व १० जूनपर्यंत. ०१३३४ दरभंगा-पुणे विशेषच्या सेवा दि. ५ व १२ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

०१३३५ पुणे-भागलपूर विशेषच्या सेवा दि. ६ व १३ जूनपर्यंत, तर ०१३३६ भागलपूर-पुणे विशेष ८ व १५ जूनपर्यंत.

०१३५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर विशेषच्या सेवा दि.२, ४, ६, ७, ९, ११, १३ व १४ जूनपर्यंत. ०१३६० गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेषच्या सेवा दि. ४, ६, ८, ९, ११, १३, १५ व १६ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

०१३६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर विशेष अतिजलदच्या सेवा दि. ३ व १० जून रोजीपर्यंत, तर ०१३६२ दानापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष अतिजलदच्या सेवा दि. ४ व ११ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

०१३६३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दरभंगा विशेषच्या सेवा दि.१, ८ व १५ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. ०१३६४ दरभंगा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दि. ३, १० व १७ जूनपर्यंत.

०१३६५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-छपरा विशेष दि. ५ व १२ जूनपर्यंत. ०१३६६ छपरा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दि. ७ व १४ जूनपर्यंत.

०१३५५ लोटिट-गोरखपूर विशेषच्या सेवा दि. १, ८ व १५ जूनपर्यंत. ०१३५६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषच्या सेवा दि.३, १० व १७ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी विस्तारित गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.