शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य साठा मर्यादेत केंद्र सरकारने केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत ...

प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कडधान्य साठा मर्यादेवर आणलेल्या बंधनांमध्ये काहीसा बदल करीत केंद्र सरकारने साठा मर्यादेत वाढ केली आहे. या निर्णयानुसार आता घाऊक व्यापारी ५०० मेट्रिक टन कडधान्य साठा करू शकतील व दालमिल उद्योग वार्षिक उलाढालीच्या ५० टक्के साठा करू शकतील. या संदर्भात व्यापाऱ्यांना पाठपुरावा करण्यासह ‘लोकमत’नेही वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १९ रोजी केंद्र सरकारने साठा मर्यादा वाढवून दिली आहे.

२ जुलै रोजी केंद्र सरकारने अचानक कडधान्यांसाठी साठा मर्यादा लागू केली होती. यामुळे घाऊक व्यापाऱ्यांना केवळ २०० मेट्रिक टनपर्यंत साठा करण्याची परवानगी होती व त्यातही एखाद्या कडधान्याचे १०० मेट्रिक टन पेक्षा जास्त साठा असू नये, अशी अट होती. याशिवाय दालमिल उद्योगांना वार्षिक उलाढालीच्या २५ टक्के पर्यंत साठा करण्याची मुभा होती. या अटी व कायद्यामुळे कडधान्य व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता व शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. इतकेच नव्हे कडधान्यांचे अगोदरच हमीभावापेक्षा कमी असलेले दर अजून २०० ते १००० प्रति क्विंटलने कमी झाले. या नवीन कायद्याच्या विरोधात देशातील अनेक बाजार समितीत व्यापाऱ्यांनी संप पुकारला होता. व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन १६ जुलै रोजी भारत बंदचे आवाहन केले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांविषयी लोकमतने पाठपुरावा करीत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच कॅट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन शेतकरी व व्यापाऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान व अडचणी लक्षात आणून दिल्या. त्या नंतर १९ जुलै रोजी केंद्र सरकारने नवीन आदेश काढून साठा मर्यादेत वाढ केली.

या नवीन आदेशानुसार आता घाऊक व्यापारी ५०० मेट्रिक टन कडधान्य साठा करू शकतील व दालमिल उद्योग वार्षिक उलाढालीच्या ५० टक्के साठा करू शकतील. यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती कॅटचे जिल्हाध्यक्ष संजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, राज्य सचिव प्रवीण पगारिया यांनी दिली.