शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या उद्योगावर ‘कोरोना’चा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 22:13 IST

निर्यात घटली : जिनिंग उद्योगांना बसला फटका

गोपाळ व्यास ।बोदवड : सुमारे महिनाभरा पूर्वीपासून चीनच्या व्ह्यूवान प्रांतात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याचा परिणाम भारतीय कापूस उद्योगावर झाला आहे. निर्यात घटल्याने या उद्योगात मंदीचे वातावरण आहे.आखाती देशातील चीन, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया या देशात भारतीय कापसाची निर्यात होत असते. त्यात पाकिस्तान मध्ये कस्टम ड्युटी वाढल्याने निर्यात आधीच घटली आहे , तर कापसाची सर्वात जास्त प्रमाणात निर्यात होणाऱ्या चीन मध्ये आलेल्या कोरोना व्हारस मुळे तेथेही निर्यात घटली आहे. कापसाच्या भारतीय बाजारपेठला आर्थिक फटका बसला आहे. या मंदीचा जिनिंगला फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे कापसाच्या जिनिंगची धडधड मंदावली असून जिनिंग उद्योगासह या उद्योगावर अवलंबून असलेला मजूरांनाही याचा फटका बसला आहे.जिनींगची धडधड मंदावलीयातच केंद्र सरकारच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) ने पाच हजार ५०० दराने कापसाची खरेदी सुरू ठेवली आहे. जिनिंग चालक मात्र पाच हजार १०० चे भाव भरत असल्याने नव्वद टक्के कापूस हा सीसीआय मध्ये जात आहे. परिणामी जिनिंगची धडधड मंदावली आहे. २४ तास चालणारा जिनिंग उद्योग उन्हाळा लागण्यापूर्वीच सात तासांवर आलेला आहे,जिनींग उद्योग संकटातयाबाबत जय वैष्णवी माता जिनिंगचे संचालक शिरीष जैन यांची प्रतिक्रिया घेतली असता आज घडीला जिनिंग चालवणे कठीण झाले असून निर्यात बंद व ट्रेंड वार चा फटका बसला असल्याने जिनिंग उद्योग संकटात आलेला आहे.बोदवड तालुक्यात जवळपास अकरा जिनिंग आणि प्रेसिंग आहे त्यात हजारोच्या संख्येने मजूर वर्ग पोट भरत आहे. त्यात काही पर परप्रांतीय मजूर कुटुंबासह आलेले आहेत. गत महिन्याभर पासून चीन मध्ये आलेल्या कोरोना व्हायरस मुळे भारतातून निर्यात होणाºया कापसाच्या गाठाणी बंद झाल्या आहेत.गठाणीची किंमत दोन हजाराने उतरलीगत महिन्यात सुमारे ४१ हजार २०० रुपयावर असलेली कापसाची एक गाठाणची (एक क्विंटल दहा किलो) किंमत दोन हजारने घटली असून आज एक गाठाणीची किंमत ३९ हजार २०० ेइतकी आहे. तर सरकीला ही त्याचा फटका बसला असून दोन हजार ४०० रुपये असलेली कापसाची सरकी आज घडीला दोन हजार १०० रुपये दराने विकली जात असल्याने त्याचा फटका जिनिग चालकांना सोसावा लागत आहे.