शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अशिक्षित आईने केले शिक्षणाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 12:46 IST

आई-वडील गावातच शेती करायचे, आई अशिक्षीत आहे, मात्र तिला असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वामुळे परिस्थिती जेम-तेम असल्यावरदेखील आईने चारही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले

अजय पाटील / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - ‘आई ला देवाची व्याख्या दिली गेली आह़े आपल्या मुलांना काय हवे आहे, हे आईला  माहिती असते. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या छोटय़ाशा गावात माङो बालपण गेले. आई-वडील गावातच शेती करायचे, आई अशिक्षीत आहे, मात्र तिला असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वामुळे परिस्थिती जेम-तेम असल्यावरदेखील आईने चारही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. आज मी शिक्षणाधिकारी पदार्पयत पोहचलो असल्याची भावना जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी व्यक्त केली. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  ते म्हणाले की, वाघळी येथे वडिलांच्या नावावर 4 एकर शेती होती. मात्र शेतात पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावर दोन हंगाम घेतले जात होते. शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नसल्याने अनेकदा आर्थिक अडचणींना कुंटुबाला  तोंड द्यावे लागत होते. मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे हे तीला नेहमी वाटायचे.ऊन असो वा पाऊस अशा स्थितीतही आई शेतात काम करायची, त्यामुळे शाळेला सुट्टी असायची त्यावेळेस आई-वडिलांना मदत होईल या हेतूने शेतात काम करायला जायचो. मात्र, शेतात गेल्यावर आईने कधीही मला शेतात काम करू दिले नाही.  तू फक्त अभ्यासालाच महत्व दे असा सल्ला आईचा होता. तसेच अनेकदा शाळेचे शुल्क भरायला देखील पैसे नसायचे अशावेळी आई कुणाकडूनही उधार पैसे आणून आमच्या शाळेची फी भरून घेत असे. जीवनात  कितीही मोठे यश मिळाले तरी आई शिवाय जीवनात कुणीही महत्वाचे नसते. पहिलीच्या वर्गापासून ते शिक्षणाधिकारीर्पयतच्या प्रवासात अनेकदा अडचणी आल्या, मात्र प्रत्येक अडचणीच्यावेळी नेहमी आई पाठीशी राहिल्याने नेहमी अडचणींवर मात करता आली. आताही अनेकदा  काही अडचणी आल्यास आईचा सल्ला घेत असल्याचे देवीदास महाजन यांनी सांगितले.