शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

स्वैर स्वातंत्र्यात हुतात्मा स्मारकांची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 21:50 IST

पाचोरा शहरातील हुतात्मा स्तंभाची दुर्दशा : आजूबाजूला अस्वच्छता, नागरिकांची नूतनीकरणाची अपेक्षा

पाचोरा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य हुतात्म्यांनी प्राणाहूती दिली. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणा?्या या वीर सुपुत्रांचं प्रेरणादायी स्मरण व्हावं म्हणून अनेक ठिकाणी हुतात्मा स्मारक आणि हुतात्मा स्तंभ निर्माण करण्यात आल आहेत. मात्र अवघ्या बाहत्तर वर्षात वीर हुतात्म्यांच्या कार्याचा अनेकांना अगदी सहज विसर पडला असल्याचे जाणवते.पाचोरा शहरात मध्यवर्ती भागातील सराफा बाजार असलेल्या गांधी चौकात याच वीर हुतात्म्यांची आठवण मनात तेवत ठेवणारा हुतात्मा स्तंभ उभा आहे. परंतु आज त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला या स्तंभाचे पूर्ण विस्मरण झाल्याचे दिसते.हा आहे स्तंभाचा इतिहास...शहरातून २६ आॅगस्ट १९४२ रोजी हुतात्मा शहादू चिंतामण बेंडाळे आणि हुतात्मा छगन राजाराम लोहार यांनी ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर झेलत स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब सुपडू भादू पाटील यांनी मुंबई अधिवेशनानंतर परत येत असतानाच स्वातंत्र्य चळवळीचा प्रचार आणि प्रसार करायला छोट्या गावात सुरुवात केली होती. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आणि २६ आॅगस्ट १९४२ ला सुपडू भादू पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौक या भागात या मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. ही बातमी कळताच पिंपळगावचे तत्कालीन फौजदार पेठेकर आनंदित होऊन मामलेदार व काही पोलिसांसह सभास्थळी आले. त्यांनी सुपडू भादू पाटील यांना अटक करण्याचा प्रयत्न करताच दोन हजारांचा समुदाय पेटून उठला होता.याच संघर्षात हुतात्मा छगन राजाराम लोहार यांना गोळी लागून ते जागीच धारातीर्थी कोसळले तर हुतात्मा माळी शहादू चिंतामण हे पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवासी होते. ते भारत वनस्पती कारखाना येथे कामगार होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बंदुकीची गोळी त्यांच्या छातीत घुसून बाहेर निघाली होती. तेही गांधी चौकात धारातीर्थी पडले. या संघर्षात सात स्वातंत्र्यसैनिक देखील गंभीर झाले होते.या स्तंभाकडे आणि त्याच्या जाज्वल्य इतिहासाकडे पाहण्याची गरज आहे. नाहीतर पुठील पिढी यापासून अनभिज्ञ राहण्याची भीती आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांनी या हुतात्मा स्तंभाची तातडीने दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे, म्हणून आग्रह धरला आहे.निदान येणा?्या प्रजासत्ताक दिनापर्यंत तरी या हुतात्मा स्तंभाचा कायापालट व्हावा, अशी अपेक्षा आहे.

शहरात गांधी चौकातील या हुतात्मा स्तंभाची आजची अवस्था अतिशय दयनीय असून या स्तंभाला कधीतरी दिलेला राष्ट्रध्वजाचा रंग पूर्णपणे उडालेला आहे. या स्तंभावर कोरलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकाची अक्षरे असोत किंवा स्तंभावरील हुतात्म्यांचे नावे असोत सारे अस्पष्ट आहे. त्याला तडेही देले आहेत. येणारी पिढी या हुतात्मा स्तंभाकडून प्रेरणा घेईल का हा प्रश्नच आहे! ह्या हुतात्मा स्तंभाच्या आजूबाजूला कधीतरी गुरंढोरं बसलेले दिसतात तर कधीतरी लहान-मोठे दुकानदार दुकान थाटतात. याच हुतात्मा स्तंभाच्या जवळच चपला काढून ठेवल्याचे देखील चित्र दिसते. या स्तंभाला आजूबाजूला असलेले कुंपण नसल्यासारखे झाले असून त्यावर असलेल्या संगमरवरी फरश्या निघाल्या आहेत तर काहींचे तुकडे झालेले आहेत.