शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शुटींगसाठी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST

स्टार - ९६५ विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या लग्न समारंभात फोटो अथवा व्हिडिओ शुटींगसाठी ड्रोनचा वापर ...

स्टार - ९६५

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या लग्न समारंभात फोटो अथवा व्हिडिओ शुटींगसाठी ड्रोनचा वापर करण्याकडे अधिक कल वाढत आहे. यासाठी अनेक वेळा ड्रोन उडविताना दिसून येतात. मात्र या साठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला दिला जात आहे. ड्रोनद्वारे शुटींग करायचीच असेल तर प्रशिक्षित ड्रोन चालकाकडूनच करावी, असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, जळगावात ड्रोन उडविण्याविषयीचा परवाना आगामी दोन ते तीन महिन्यात दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

लग्न समारंभ म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण कॅमेरात टिपणे अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात आता ड्रोनद्वारे शुटींग करण्यास पसंती वाढत आहे. त्यातही प्री वेडींग शुटींगसाठी ड्रोनचा अधिक वापर केला जातो. मात्र ड्रोनचा वापर करताना ते योग्यरित्या उडविता आले पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दक्षता म्हणून ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, त्यांच्याकडून शुटींग केल्यास धोका कमी होतो.

ड्रोन उडविण्यासाठी परवाना हवा!

१) ड्रोन उडवायचे झाल्यास त्यासाठी परवानगी, लायसन्स हवे असते. ज्या भागात ड्रोन उडवायचे आहे, त्या भागातील पोलीस ठाण्यात अर्ज द्यावा लागतो.

२) ड्रोनचे लायसन्स हे दिल्ली येथील डीजीसीए या संस्थेकडून दिले जाते. त्यासाठी अर्ज करून हे लायसन्स मिळते.

३) जळगावात अद्याप नियमावली आली नसून परवानादेखील दोन ते तीन महिन्यांनंतर देणे सुरू होणार आहे.

प्रशिक्षण घेऊनच ड्रोन उडवा

ड्रोन उडविण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. स्वत:कडे किमाण प्रमाणपत्र तरी हवे. प्रशिक्षण घेतलेले असल्यास यात सर्वांचीच सुरक्षितता राहू शकते.

- नीलेश शिंदे, ड्रोन चालक

ड्रोन वापरण्याचेही नियम

-ड्रोन उडवायचे असल्यास त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

- कोणत्याही भागात ड्रोन उडवायचे असल्यास यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

- ड्रोन १०० फुटापेक्षा अधिक उंचीवरून ड्रोन उडविता येणार नाही

- ज्या भागात शुटींग करायची आहे, त्या भागातील पोलीस ठाण्यात अर्ज द्यावा लागतो.

- विमानतळ, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालय परिसरात ड्रोन उडविता येत नाही.

- विनापरवानगी ड्रोन उडविल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे एकतर परवाना अथवा प्रमाणपत्र आ‌वश्यक आहे.

एका दिवसाचे सात ते आठ हजार रुपये

- ड्रोनद्वारे शुटिंग करण्यास पसंती वाढत असल्याने त्यांचे भावही काहीसे वधारत आहे.

- लग्न समारंभात एका दिवसाच्या शुटिंगसाठी सात हजार रुपये खर्च येतो. यात शहराबाहेर जायचे असल्यास आठ हजार रुपये खर्च येतो.

- लग्न समारंभात ड्रोनद्वारे शुटींग करायची झाल्यास ती प्री वेडिंगच अधिक असते. त्यामुळे या दिवसासाठी अधिक खर्च केला जातो.