शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या तरुणाचा इचलकरंजीत खून

By admin | Updated: May 6, 2017 16:37 IST

7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 6 - शालकाच्या लगAाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या बबलू सुभाष नवले (वय 33 रा. जळगाव) या तरुणावर इचलकरंजी (जि.कोल्हापूर) येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता 7 ते आठ जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या बबलू याला कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी नगर, इचलकरंजी पोलीस स्टेशनला कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य 4 ते 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बबलू नवले याच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, बबलू याचा शालक विशाल विनायक नेतलेकर (रा. जळगाव) याचे 8 मे रोजी इचलकरंजी येथे लगA आहे. मुलगी इचलकरंजी येथील असल्याने लगA सोहळा तिच्याकडे आयोजित करण्यात आला आहे. या लगAाची पत्रिका वाटपासाठी बबलू  व त्याची मेहुणी लक्ष्मी असे दोघं जण 2 मे रोजी रेल्वेने जळगाव येथून गेले होते. चुलत शालकाचा होता जुना वादकोल्हापूर, सातारा, नीर, ता.बारामती येथे पत्रिका वाटप झाल्यानंतर बबलू व त्याचा चुलत शालक रोहन सावंत हे दोन्ही जण शुक्रवारी दुचाकीने इचलकरंजी परिसरातील पत्रिका वाटपाचे काम करीत असताना रात्री साडे नऊ वाजता दकनूर चौकात रोहन व कुणाल सावंत यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये यापूर्वीही वाद होते. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बबलूवर काही जणांनी गुप्ती व धारदार शस्त्राने हल्ला केला. बबलू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. यावेळी तातडीने बबलूला इचलकरंजी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर कोल्हापूरला हलविण्यात आले.सात जणांविरुध्द गुन्हाया घटनेप्रकरणी कुणाल सावंत, त्याचा मामा व अन्य पाच जण अशा सात जणांविरुध्द रात्रीच इचलकरंजीतील शिवाजी नगर पोलीस स्टेशनला कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी बबलूची प्राणज्योत मालवल्याने खुनाचे कलम वाढविण्यात येतील असे ठाणे अमलदाराने सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक नरळे करीत आहेत.घटनास्थळावरून जळगावला केला फोनही घटना घडल्यानंतर तेथील कंजरभाट समाजाचे नेते जयराज भाट यांनी जळगाव येथे नरेश बागडे यांच्याशी रात्री दीड वाजता फोन करून माहिती दिली. त्यानंतर बागडे, राहुल नेतलेकर, विजय अभंगे व सचिन बाटुंगे असे समाजबांधव शनिवारी इचलकरंजी येथे रवाना झाले. दरम्यान, या घटनेमुळे विशालचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.बबलू रोजगारासाठी आला जळगावातबबलू याचे मूळ गाव नीर, ता.बारामती आहे. त्याचे आई व वडील गावाकडेच असतात. रोजगारानिमित्त तो काही वर्षापासून जळगावात स्थायिक झाला होता. प}ी नूतन, मुलगी दर्शन (वय 8), मुलगी जान्हवी (12) व वैष्णवी (वय 10) यांच्यासह बबलू तांबापुरा, कंजरवाडा येथे राहत होता.