शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानवी शरीराचे परीक्षण आता ‘कॉर्डलेस’ तंत्रज्ञानाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 11:56 IST

मार्गदर्शन : ‘आयएमए’च्या राज्यस्तरीय परिषदेचा समारोप

ठळक मुद्देदुर्बीणीद्वारे वेळीच उपचार शक्य जळगावात आणखी मोठी परिषदडॉक्टरांच्या हितासाठी कार्य सुरूच

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 - दुर्बीणीद्वारे विविध आजारांचे निदान व योग्य उपचार करणे तसेच शस्त्रक्रियादेखील केल्या जात असल्याच्या तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन बदल आणले.  आता याही पुढे जाऊन ‘कॅप्सूल इंडोस्कोपी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे केवळ एक कॅप्सूल घेऊन शरीराला स्पर्शही न करता मानवी शरीराचे परीक्षण करणे शक्य असल्याचा सूर ‘आयएमए’च्या  राज्यस्तरीय परिषदेत उमटला.   वैद्यकीय क्षेत्रातील अशा विविध विषयावरील मार्गदर्शनाद्वारे या परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील डॉक्टरांना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यात आली. दरम्यान, या परिषदेचा रविवारी संध्याकाळी यशस्वी समारोप झाला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने ‘अॅम्सकॉन 2017’ या अॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे जळगाव येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्याचा रविवारी संध्याकाळी समारोप झाला. डॉक्टरांच्या अभ्यासाच्यादृष्टीने आयोजित केल्या जाणा:या या परिषदेत  दोन दिवसांमध्ये नवनवीन शोध, उपचारपद्धती, तंत्रज्ञान अशा एकूण 24 वेगवेगळ्य़ा विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सध्या कर्करोगासारख्या आजाराचे प्रमाण विविध कारणांनी वाढत आहे. याचे अचूक निदान वेळीच झाले तर योग्य उपचार मिळण्यासह शस्त्रक्रियाही टाळणे शक्य असल्याचे डॉ. ऋषिकेश चौधरी यांनी सांगितले. ‘पंचन संस्थेचे दुर्बीर्णीद्वारे परीक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया तर केल्या जातातच, स्वादूपिंड, पित्ताशयातील खडे, अन्ननलिका, जठर, आतडे यांच्या आजारांसह कर्करोगाचेही निदान दुर्बीणीद्वारे करता येऊ शकते. यामुळे शस्त्रक्रियेपूर्वीच  पहिल्याच टप्प्यात योग्य उपचार करता येणे शक्य झाले असल्याचे सांगितले. ‘कॅप्सूल इंडोस्कोपी’ने क्रांतीदुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यापाठोपाठ आता शरीराला कोणतेही उपकरण न जोडता अथवा केबल, नळीतून निरीक्षण न करता ‘कॅप्सूल इंडोस्कोपी’ तंत्रज्ञानाने क्रांती आणली आहे. ही उपचारपद्धती जळगावातही उपलब्ध झाली असून या विषयी उपस्थित इतरही डॉक्टरांना माहिती देण्यात आली. आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. विश्वेश अग्रवाल,  परिषदेचे प्रमुख पॅट्रन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, आयोजन  समितीचे अध्यक्ष  डॉ. विलास भोळे, सचिव डॉ. स्नेहल फेगडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिका:यांनी परिश्रम घेतले. जळगावात आणखी मोठी परिषद - डॉ. अशोक तांबेजळगावात झालेली ही परिषद यशस्वी ठरली असून यामधून राज्यभरातील डॉक्टरांना वेगवेगळ्य़ा विषयांची सखोल माहिती मिळाली. त्यामुळे भविष्यात याहीपेक्षा मोठी परिषद जळगाव येथे घेण्यात येईल, असा मानस आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी व्यक्त केला. डॉक्टरांच्या हितासाठी कार्य सुरूच -डॉ. राजेश पाटीलडॉ. राजेश पाटील यांनी सांगितले की, डॉक्टरांसाठी नवनवीन काय आहे, याचा शोध घेत त्यांच्या हितासाठी जे काही असेल ते करीत राहू व यापुढेही जळगावात अशा परिषदांसाठी आपली तत्परता असेल, अशी ग्वाही दिली.