शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणींनो गॅस पेटवताना करा चारदा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून सलग तीन महिने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून सलग तीन महिने गॅसचा दर स्थिर होता. मात्र आता पुन्हा केंद्र सरकारने गॅसचा दर वाढवला आहे. जळगाव जिल्ह्यात गॅसचा आता ८४० रुपये प्रति सिलिंडर एवढा दर आहे.

कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबरमध्ये सहाशे रुपयांना मिळणारा १४ किलोचा एक सिलिंडर हा आता ८४० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या सामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाचा दर सातत्याने वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात इंधनाचा दर साडेपाचशे रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर गेल्या काही नोव्हेंबरपासून आतापर्यंत दरात सातत्याने वाढ होत आहे.

सर्वात जास्त वाढ ही मार्च महिन्यात करण्यात आली होती. त्यात फेब्रुवारी महिन्यात ७२४.५० रुपये दराने गॅस मिळत होता. तर मार्च महिन्यात हाच दर ८२४.५० रुपये झाला. एकाच महिन्यात सरकारने या दरात १०० रुपयांची वाढ केली आहे.

आता पुन्हा चूल पेटवायची का?

सरकारने उज्ज्वला योजनेत सामान्यांसाठी गॅस कनेक्शन मोफत दिले. त्यानंतर गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली. आधी गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळत होती. नंतरच्या काळात ही सबसिडीदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे ज्यांनी उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शन घेतले. त्यांच्या घरात आता पुन्हा चूल पेटवायची वेळ आली आहे. कारण गरीब घरांमध्ये ८४० रुपये दराने गॅस परवडेल कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नोव्हेंबर २०२० - ५९९.५०

डिसेंबर २०२० - ६४९.००

जानेवारी २०२१ - ६९९.५०

फेब्रुवारी २०२१ - ७२४.५०

मार्च २०२१ - ८२४.५०

एप्रिल २०२१ - ८१४.५०

मे २०२१ - ८१४.५०

जून २०२१ - ८१४.५०

जुलै २०२१ - ८४०