शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शनअभावी निवासस्थाने धुळखात

By admin | Updated: January 4, 2017 01:12 IST

तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाºयांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण होवून वर्षे झाले.

तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाºयांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांचे बांधकाम पूर्ण होवून वर्षे झाले. केवळ वीज कनेक्शनअभावी ही निवासस्थाने धुळखात पडली असून, संबंधित कर्मचाºयांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेऊन मीटर उपलब्ध करून देण्याची अपेक्षा कर्मचाºयांनी केली आहे.केंद्र सरकारच्या राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत तळोदा उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाºयांसाठी सन २०१३ साली निवास स्थान मंजूर करण्यात आली होती. यासाठी शासनाने साधारण पावणे दोन कोटी रुपयेदेखील उपलब्ध करून दिले आहे. या निधीतून संबंधित ठेकेदाराने युद्ध पातळीवर कामाचे नियोजन करून सर्व निवास्थाने तयार केलीत. विशेष म्हणजे ही निवासस्थाने पूर्ण होऊन साधारण एक वर्ष झाले. तथापि वीज मीटरअभावी ही निवासस्थाने तशीच धूळखात पडली आहे. परिणामी हस्तांतरदेखील रखडले आहे. वास्तविक निवास स्थानांच्या हस्तांतरणासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने संबंधित सार्वजनिक विभागास अनेक वेळा पत्र दिले आहे. तथापि संबंधितांकडून त्यांना केवळ वायदेच दिले जात आहेत. याबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता धुळे विभागाच्या इलेक्ट्रीक्स विभागाकडे याप्रकरणी पाठपुरावा केला आहे. मीटरबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. शासनाने निवासस्थानासाठी करोडो रुपये खर्च केले असताना यंत्रणेच्या उदासिनतेमुळे अजूनही कर्मचाºयांना निवासांपासून वंचित राहावे लागत आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वीजपुरवठ्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.        (तालुका प्रतिनिधी)कर्मचारी राहतात पडक्या इमारतीत४काही कर्मचारी रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत राहत आहेत. तथापि या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे अशा पडक्या निवासस्थानांमध्ये कर्मचाºयांना राहावे लागत आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाकडे कर्मचाºयांनी निवास स्थानांची मागणी केली होती, कर्मचाºयांची मागणी मान्य करत अखेर शासनाने तीन वर्षांपूर्वी निवासस्थाने मंजूर केले. ही निवासस्थाने बांधूनही पूर्ण झाले. मात्र वीज कनेक्शनअभावी वैद्यकीय अधिकाºयांनाही तेथे पूर्णवेळ राहणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने वीजपुरवठ्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.