शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

निंबादेवीच्या दर्शनावरून परतताना दुचाकी घसरून तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

मुकेश हा मंगळवारी सकाळी ११ वाजता मित्र सतीश विजय संदानशिव याला सोबत घेऊन दुचाकीने यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील निंबादेवी ...

मुकेश हा मंगळवारी सकाळी ११ वाजता मित्र सतीश विजय संदानशिव याला सोबत घेऊन दुचाकीने यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील निंबादेवी या देवस्थानावर दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता दुचाकीने पुन्हा जळगावकडे परत निघाले. ममुराबाद गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीच्या धडकेपासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात मुकेश याची दुचाकी घसरली. त्यामुळे मुकेश व सतीश हे दोघेही रस्त्यावर पडले. यात मुकेश गंभीर जखमी झाला होता, तर सतीश किरकोळ जखमी झाला होता.

मुकेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता मुकेशचा मृत्यू झाला. मुकेश हा गणेश कॉलनी परिसरातील वाईन शॉपच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्‍चात पत्नी सीमा, मुलगा कृष्णा (वय १ वर्ष), दोन भाऊ दिनेश व महेश असा परिवार आहे.