शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाबाबत काथ्याकुट अन् अपघात सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 01:04 IST

आहुजानगरनजीक घटना : मतदानासाठी जात असताना ट्रकने वाघनगरातील दाम्पत्यास उडविले

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चुंचाळे, ता. चोपडा येथे मतदान करण्यासाठी दुचाकीवर जात असताना शरद इधन कापुरे (30), अनिता शरद कापुरे (25, दोघे रा. वाघनगर, जळगाव) यांच्या दुचाकीला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हे दाम्पत्य जखमी झाले. यात अनिता कापुरे यांना गंभीर इजा झाली आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर आहुजानगरनजीक घडला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून बालंबाल बचावलेल्या या दाम्पत्यावर  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी पुन्हा अपघात झाला. असुरक्षित महामार्गाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे.  उपाययोजना होत नसल्याने अपघात सुरूच आहे. अशाच प्रकारे गुरुवारीदेखील महामार्गावरुन वाहन खाली उतरवूनही दुचाकीला धडक बसली. रिक्षा चालकाने आणले रुग्णालयातअपघातानंतर शरद कापुरे यांनीच एका रिक्षा चालकाच्या मदतीने अनिता कापुरे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे महिलेल्या डोक्याला टाके पडले असून दोघांवरही उपचार सुरू आहे. बालंबाल बचावलेमागून येणा:या ट्रकचा वेग पाहून शरद कापुरे यांनी आपली दुचाकी (क्र.एम.एच.19 सी.एल.1798) रस्त्याच्या खाली उतरविली. अन्यथा रस्त्यावरच ही धडक बसली असती तर जीवावर बेतण्याची शक्यता होती. त्यामुळे बालंबाल बचावल्याचे शरद कापुरे यांनी सांगितले. ट्रकचालक फरारअपघातानंतर ट्रक चालक न थांबताच निघून घेला. त्यात दुचाकीस्वाराने क्रमांक पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात केवळ पी.बी. 4613 एवढाच क्रमांक दिसला. त्यातील सिरीज लक्षात आली नाही, एवढय़ा वेगात हा ट्रक चालक होता. धोकादायक ठिकाणमहामार्गावरील आहुजानगरचे हे ठिकाण अत्यंत धोकादायक ठरत असून दोन महिन्यांपूर्वीच एका कंटनेरला कारची धडक बसून नाशिकच्या तिघांचा जळून कोळसा झाला होता.त्यानंतर कांदा घेऊन येणा:या ट्रॅक्टरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते.  महामार्गावरील अपघातांचे हे प्रमाण पाहता तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.