शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अॅपच्या मदतीने झाला ‘मृदा विज्ञान’चा अभ्यास सोपा

By admin | Updated: May 15, 2017 17:19 IST

‘सॉईल सायन्स- अॅट अ ग्लान्स’ हे पुस्तक भडगाव तालुक्यातील भातखंडे या छोटय़ाशा गावातील डॉ.गोपाल महाजन यांनी अॅपच्या स्वरूपात तयार केले आहे.

संजय पाटील / ऑनलाइन लोकमतभातखंडे, जि. जळगाव, दि. 15 - ज्युनिअर रिसर्च फेलोशिप, सिनियर रिसर्च फेलोशिप, भारतीय प्रशासकीय सेवा समकक्ष अॅग्रीकल्चर रिसर्च सव्र्हिसेस या परीक्षेच्या ‘मृदा विज्ञान’ या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणारे ‘सॉईल सायन्स- अॅट अ ग्लान्स’ हे पुस्तक भडगाव तालुक्यातील भातखंडे या छोटय़ाशा गावातील  डॉ.गोपाल महाजन यांनी अॅपच्या स्वरूपात तयार केले आहे.  यामुळे हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडून व अॅपच्या माध्यमातून गंमतीशीररित्या सहज या विषयाचा अभ्यास करण्याची संधी डॉ. महाजन यांनी उपलब्ध करून दिली आहे. भातखंडे बुद्रुक ता.भडगाव येथील मूळ रहिवासी तसेच ‘मृदा विज्ञान’ या विषयात पी.एचडी केलेले डॉ.गोपाल महाजन हे  सध्या  गोवा येथे कृषी शास्त्रज्ञ (मृदा विज्ञान) म्हणून आय.सी.आर. केंद्रीय किनारा कृषी संशोधन केंद्रात कार्यरत आहेत. मृदा विज्ञान या विषयाकडे  विद्याथ्र्याचा फारसा कल नसतो.  त्यामुळे हा विषय सोपा वाटावा व त्याकडे कल वाढावा यासाठी हा विषय  अधिकाधिक विद्याथ्र्यार्पयत पोहचण्यासाठी डॉ.महाजन यांनी ‘सॉईल सायन्सेस - अॅट अ ग्लान्स’ पुस्तक लिहिले.  भारतीय प्रशासकीय सेवा समकक्ष अॅग्रीकल्चर रिसर्च सव्र्हिसेस  परीक्षेत देशात तिसरा क्रमांक मिळविला असून चांगली नोकरीही आहे.  मात्र इतरही विद्याथ्र्याना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी डॉ. महाजन हे केवळ पुस्तक लिहूनच थांबले नाही तर त्यांनी त्यातही अभिनव आणि नाविन्य म्हणून  याच पुस्तकाचे मोबाईल अॅप बनविले. या अॅपचे नाव ‘ऑब्जेक्टीव्ह सॉइल सायन्स’ असे असून विद्याथ्र्याना अगदी गमतीशीर पद्धतीने अभ्यास करता यावा व त्यांच्यार्पयत थेट पोहचता यावे हा या मागचा उद्देश असल्याचे महाजन यांनी सांगितले.  विद्याथ्र्याची अडचण लक्षात घेता हे अॅप त्यांनी सर्वासाठी मोफत केले आहे. अवघ्या सहा महिन्यात या अॅपचा लाभ भारत, पाकिस्तान, फिलीपाईन्स, नायजेरिया, बांगलादेश, नेपाळ अशा अनेक देशातील जवळपास 3200 विद्याथ्र्यानी घेतला आहे. जगात कोणताही व्यक्ती हे अॅप विनामूल्य आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करू शकतो. या अॅपमध्ये 81 क्विझ आहे. प्रत्येक क्विझमध्ये 30 प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाच्या चार उत्तरापैकी योग्य उत्तर निवडल्यास त्यानंतरचा प्रश्न सोडवायला मिळेल. विद्याथ्र्याना उच्च परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो. हे अॅप विनामूल्य असून कोणतीही व्यक्ती आपल्या मोबाईल फोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करू शकतो. दरवर्षी 20 लाख उत्पन्न देणारे अॅप विद्याथ्र्यासाठी विनामूल्य आहे.-डॉ.गोपाल महाजन