तालुक्यातील काही मंडळांमध्ये तर अतिवृष्टी होत आहे. जवळपास एकाच वेळेस ८० ते ८५ मिलीमीटर पावसाची नोंद धानोरा, अडावद,चहार्डी यासारख्या मोठे कार्यक्षेत्र असलेल्या मंडळांमध्ये शासकीय दप्तरी नोंद करण्यात आली आहे. यामुळे संकरित बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात संकरित कापसात गुडघाभर पाणी साचल्याने शेतं पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. कापसाच्या एका झाडावर ५० ते ७० कैऱ्या पक्व झाल्याने सगळ्याच कैऱ्या सडून जात आहेत. हाती आलेला घास अतिपावसाने आणि निसर्ग कोपल्याने हिरावून नेला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेला आहे.
जेमतेम कमी पावसात ठिबक नळ्याच्या सहाय्याने पाणी देऊन कापूस पीक वाचविण्यात यश आले होते. मात्र उशिरा आलेला आणि अति प्रमाणात पाऊस पडल्याने अखेर जिवंत ठेवलेला कापूस नेस्तनाबूत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. कोणत्याच बाजूने शेतकऱ्याला धीर मिळत नसल्याने खचले आहेत.
090921\09jal_4_09092021_12.jpg
अति पावसाने तोंडी आलेला घास हिरावून नेला