शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या भीतीने हॉकर्सची ‘लपाछपी’

By admin | Updated: February 18, 2017 00:29 IST

फुले मार्केटमधील स्थिती : भंगार बाजार, चित्रा चौक व बी.जे.मार्केटमधील अतिक्रमण कधी हटविणार?

जळगाव : मनपा कर्मचा:यांची निवडणूक कामातून मुक्तता झाली असून शुक्रवारपासून अतिक्रमणधारक हॉकर्सवर मनपाच्या अतिक्रमण निमरूलन विभागाकडून कारवाई होईल, या भीतीने फुले मार्केटमधील अतिक्रमणधारक हॉकर्सनी दिवसभर दुकाने थाटलीच नाही. दरम्यान, अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक आज दिवसभर तळ ठोकून होते.इतर मार्केटची अतिक्रमणेही काढा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी शुक्रवारी मनपा आयुक्तांकडे अतिक्रमणांबाबत तक्रार केली आहे. 12 रोजी केलेल्या कारवाईनंतर फुले मार्केटमध्ये प्रवेश करणे सुकर झाले होते. वाहनधारकांना वाहनतळार्पयत गाडय़ा नेता येत होत्या. त्यामुळे समोरील रस्तेही मोकळे दिसत होते. मात्र मनपा कर्मचारी नसल्याने दोन दिवस पुन्हा अतिक्रमणे झाली. मात्र आता कारवाई सत्र हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. फुले मार्केटप्रमाणे बी.जे. मार्केट, अजिंठा चौफुलीकडील भंगार बाजार, चित्रा चौक यासह सर्व व्यापारी संकुलांच्या भोवती असलेली अतिक्रमणे काढली जावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच याप्रश्नी चर्चा करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे. रविवारपासून लपाछपीफुले मार्केटमधील वाढती अतिक्रमणे, रस्त्यावरून जात असताना येत असलेल्या अडचणी, तसेच महिलांना होत असलेल्या त्रासाबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी या भागातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश केले होते. गेल्या रविवारी सुटी असताना मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले. मार्केटमध्ये व्यावसायिकांनी काही ठिकाणी लोखंडी पेटय़ा ठेवलेल्या होत्या, त्यादेखील जप्त करण्यात आल्या. त्यानंतर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस या ठिकाणी अतिक्रमणे नव्हती. त्यामुळे अनेक वर्षानंतर मार्केटने मोकळा श्वास घेतल्याचे दृश्य या भागात पाहायला मिळाले. बुधवारी पुन्हा अतिक्रमणेबुधवारपासून मनपातील कर्मचा:यांवर जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी होती. त्यामुळे मनपातील जवळपास 400 कर्मचारी या जबाबदारीवर होते. ही संधी साधून दोन दिवस मार्केटमध्ये पुन्हा अतिक्रमणे झाली. कर्मचारी नसल्यामुळे कारवाई शक्य नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आज मनपाचे कर्मचारी परतल्याने कारवाईच्या भीतीने हॉकर्सने या भागात गाडय़ा किंवा दुकाने लावली नाहीत. मनपा अतिक्रमण विभागाचे पथक या ठिकाणी तळ ठोकून होते. नजीकच्या काही दुकानांमध्ये हॉकर्स आपले सामान ठेवत असतात. पथक बाजूला गेले की सामान बाहेर काढण्यात येते. असा लपाछपीचा खेळ येथे दिसून आला. शनिवार हा बाजाराचा दिवस असतो, त्यामुळे काय परिस्थिती राहते याकडे लक्ष लागून आहे. मनपाने अजिंठा चौफुली परिसरातील भंगार बाजार, बी.जे. मार्केट परिसरातील अतिक्रमण हटविण्याचीही मागणी होत आहे.काव्यर}ावली चौकातील हॉकर्सना तंबीकाव्यर}ावली चौक ते महाबळ कॉलनीकडे जाणा:या रस्त्यावर 20 ते 22 खाद्यपदार्थाच्या गाडय़ा सायंकाळनंतर उभ्या असतात. या ठिकाणी सध्या डॉ.भवरलाल जैन थीम पार्कचे काम सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच उद्घाटन सोहळा प्रस्तावित आहे. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लावू नयेत, अशा सूचना त्या ठिकाणच्या हॉकर्सना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा रस्ताही आता मोकळा होणार आहे. या भागातील हॉकर्स तसेच महाबळ रस्त्यावरील अतिक्रमणेही येत्या दोन दिवसात काढण्यात येणार आहेत.