शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सुवर्ण बाजारात उलाढाल निम्म्यावर

By admin | Updated: July 2, 2017 11:37 IST

‘जीएसटी’ लागू झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट : दाणाबाजारात फक्त 10 टक्के व्यवसाय इलेक्ट्रॉनिक दुकाने, मॉलमध्येही परिणाम

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.2 - वस्तू व सेवा कर शनिवार, 1 जुलैपासून लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या कराचा परिणाम शहरातील बाजारपेठांवर दिसून आला. सुवर्ण बाजार व डाळ उद्योगातील उलाढाल निम्म्यावर आली होती, तर दाणा बाजारात केवळ 10 टक्केच उलाढाल झाल्याची माहिती व्यापा:यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
30 जून रोजी मध्यरात्री देशभरात वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंच्या भावांवर परिणाम झाला. वस्तूंवर कर लागू होणार असल्यामुळे काही वस्तू या महाग होतील यामुळे जळगावातील अनेक इलेक्ट्रॉनिक व कपडय़ांचा दुकानावर शुक्रवारी ग्राहकांनी मध्यरात्रीर्पयत गर्दी केली होती.  मात्र वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर शनिवारी शहरातील बाजारपेठांमधील व्यवहार मंदावले.  ग्राहकांनीही बाजारपेठेकडे पाठ फिरविली होती. 
सुवर्ण बाजाराकडे ग्राहकांची पाठ
सुवर्ण बाजारावर मोठा परिणाम झालेला दिसून आला. सोन्याच्या किमतीत सध्यातरी वाढ झाली नसली तरी पहिल्या दिवशी सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.  काही दालनांमध्ये अत्यल्प ग्राहक दिसून आले. 
शुक्रवारी झालेल्या उलाढालीच्या तुलनेत सोने खरेदीत शनिवारी 50 टक्क्यांची घट झाल्याची माहिती महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी दिली. तसेच जीएसटी लागू होणार असल्यामुळे व्यापा:यांनी त्यासाठीची सर्व तयारी केली होती. शनिवारी ग्राहकांना जीएसटी प्रणालीची बिले देण्यात आली. 
डाळींच्या दरात कोणतीही वाढ नाही
अन्न-धान्यावर आधी कोणताही कर लागू नव्हता. मात्र आता पहिल्यांदाच ब्रॅण्डेड धान्यावर कर लागू झाल्यामुळे धान्य महाग होणार आहे. मात्र पहिल्या दिवशी दाणाबाजारात ब्रॅण्डेड धान्याचे दर स्थिर होते. जून-जुलै महिना हा मंदीचा समजला जातो.  या काळात मोठी उलाढाल होत नसते. त्यामुळे वस्तू व सेवा कर प्रणालीचा परिणाम दाणाबाजारावर झाला नसला तरी ऑगस्ट महिन्यानंतर अन्न-धान्य व्यवसायावर मोठा परिणाम जाणवेल, असे प्रवीण पगारिया म्हणाले.