शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार- गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 15:30 IST

1 कोटी 87 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन

 ऑनलाईन लोकमत

जळगाव, दिनांक 5:- धरणगाव शहरातील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणारा निधी तत्काळ उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी दिली.
धरणगाव  नगरपालिकेतर्फे करण्यात येणा:या 1 कोटी 87 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन त्यांच्या  हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पंचायत समितीचे सभापती सचिन पवार, उपसभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, मुख्याधिकारी सपना वसावा, गुलाबराव वाघ उपस्थित होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, धरणगाव शहरातील नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 7 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच 5 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मंजूर कामांपैकी आज दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सोनवद रस्ता स्मशानभूमी मध्ये हॉल बांधणे 28 लाख रुपये, पेव्हर ब्लॉक बसविणे 68 लाख रुपये, वैशिष्टपूर्ण योजनेतंर्गत शहरात 9 लक्ष लिटर पाण्याची टाकी बांधणे 63 लाख रुपये, शहरातील महात्मा गांधी उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापयर्ंत पाईप लाईन टाकणे 28 लाख रुपये अशी  एकूण 1 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांच्या कामांचे भुमिपुजन करण्यात आले आहे. नवीन पाण्याच्या टाकीमुळे शहरातील पाणी साठविण्याची क्षमता वाढणार असून त्यामुळे शहराला पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरणाचा प्रस्ताव असून हे कामही लवकरच सुरु करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. धरणगाव नगरपालिका संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचे केंद्रीय समितीने जाहिर केल्याबद्दल मुख्याधिकारी सपना वसावा यांचा सत्कार करण्यात आला.