शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्यांना उभारी देणारा शिक्षक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:51 IST

मुख्याध्यापक जयप्रकाश लांबोळे यांचे निधन : ‘विनर्स क्लब’ व्दारे विद्यार्थ्यांना द्यायचे आत्मविश्वास

जळगाव : जीवनात अपयश आल्यानंतर अनेक विद्यार्थी खचतात व गैरमार्गांचा अवलंब करतात. आयुष्यात चढ-उतारांचा सामना हा प्रत्येकाला करावाच लागतो. त्यामुळे संघर्षाचा सामना करून त्यावर मात करा, असा सल्ला देत अनेक खचलेल्या विद्यार्थ्यांना उभारी देणारे व एक यशस्वी युवक तयार करणारे भाऊसाहेब काशीनाथ लाठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक जयप्रकाश लक्ष्मण लांबोळे (वय ४५) यांचे शुक्रवारी पहाटे २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी व शिक्षक प्रिय विद्यार्थी व शिक्षक प्रिय अशी त्यांची ओळख होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ व बहिणी असा परिवार आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा या लहान गावापासून सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासात त्यांनी अपयशाने खचलेल्या अनेक युवकांचे यशस्वी जीवन घडविले आहे.भा.का.लाठी विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता समाजात वावरताना आवश्यक असलेले व्यवहारीक ज्ञान देखील त्यांनी          दिले. त्यांच्या निधनामुळे  शुक्रवारी शाळेला सुट्टी देण्यात आली व आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळातच आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, मान्यवरांना धक्का बसला.लांबोळे सर जळगावात  भा.का.लाठी शाळेत शिकविण्यासाठी आल्यानंतर मी त्यांच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे.  दुसरीपासून त्यांच्यासोबत सुरु झालेला प्रवास आय.पी.एस. झाल्यानंतर देखील सुरु होता. आई-वडीलांनंतर लांबोळे सर माझे आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. -राहुल लोढा, आय.पी.एस. अधिकारी