शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडला शासकीय कार्यालये ‘वा:यावर’

By admin | Updated: December 29, 2015 00:25 IST

रिक्त पदाचा वनवास संपण्याचे नाव घेत नसल्यामुळे शासकीय कार्यालय वा:यावर आहे.

बोदवड : एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे अगोदरच तालुक्याची स्थिती आहे. त्यात शासकीय अधिका:यांच्या रिक्त पदाचा वनवास संपण्याचे नाव घेत नसल्यामुळे शासकीय कार्यालय वा:यावर आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांची गाडी रुळावर आणण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नसल्याची स्थिती आहे.

येथे तालुका आरोग्य अधिकारीपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपद बारा वर्षापासून रिक्त आहे. शिवाय वैद्यकीय अधिका:यांची दोन पदे दोन वर्षापासून रिक्त आहे.

ग्रामीण रुग्णालय बंद असल्यासारखीच स्थिती आहे. बोदवड, नाडगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण देणारी संस्था (आयटीआय) आहे. तेथील प्राचार्यपद ही गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. पूर्वी प्रभारी म्हणून प्रा.राठोड हे काम पाहत होते.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी, उद्योग, शिक्षण विस्तार अधिकारी, वाहनचालक अशी 14 पदे रिक्त आहेत. जि.प. शाळांमधील शिक्षकांची 30 व आठ ग्रामसेवक अशी 52 पदे पं.स.त रिक्त आहेत. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र, येवती व एणगाव येथील आरोग्य अधिका:यांचीपदे रिक्त आहेत. तालुका पशुधन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी ही पदे तीन ते चार वर्षापासून रिक्त आहेत. हीच परिस्थिती तहसीलदार कार्यालयाची आहे. तीन नायब तहसीलदार, एक पुरवठा निरीक्षक, तलाठय़ांची चार पदे हे तीन वर्षापासून रिक्त आहेत.

पोलीस ठाणे ही रिक्त पदातून सुटले नाही. दोन पोलीस उपनिरीक्षक सोबत नऊ पोलीस कर्मचा:यांची पदे रिक्त आहेत. त्यात गोपनीय पोलिसांचादेखील समावेश आहे.

वीज कंपनीही वा:यावर

वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता एक पद गत वर्षभरापासून रिक्त आहे. ग्रामीण सहायक उपअभियंता शहर सहायक उपअभियंता अशी चार पदे वीज कंपनीची रिक्त आहेत. 17 तंत्रज्ञांची पदे रिक्त, सहायक कनिष्ठ पदे रिक्त आहे.

बोदवडसह तालुक्यासाठी 27 ग्रामसेवक पदे मंजूर आहेत. त्यातील आठ पदे रिक्त आहेत.

आरोग्य, प्रशासन, सुरक्षा, वीज वितरण व शासकीय सेवा देणा:या सर्वच शासकीय कार्यालयात रिक्त पदांमुळे ठणठणाट आहे. काही अधिकारी ग्रामीण भाग असल्यामुळे येथे राहण्याची व प्रवासाची सुविधा नसल्यामुळे बोदवडला बदलीच्या नावाने नाक मुरडतात. त्यामुळे डझनभर अधिकारी व शेकडो कर्मचा:यांची पदे रिक्त आहेत. वीज कंपनीत एकूण 39 पदे रिक्त आहेत. पंचायत समितीत 54 पदे दोन्ही विभागात रिक्त पदे जास्त आहेत. या पदांना भरण्यासाठी कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांना सेवा देण्यास वेठीस धरले जात आहे. (वार्ताहर)