शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’मधून उलगडला चित्रपट गीतांचा सुवर्णकाळ

By admin | Updated: July 2, 2017 11:28 IST

सदाबहार गीतांनी मंत्रमुग्ध : व.वा. वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.2 : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणा:या सन 1913 ते 1965 च्या काळातील  ‘अजीब दास्तॉ है यह’, ‘मै तो कब से खडी हू’, ‘मधुबन में राधिका नाचे रे’ अशा एकाहून एक सरस गीतांनी  रसिक मंगमुग्ध झाले. 
व.वा. जिल्हा वाचनालयाच्या 140 व्या वर्धापन दिनानिमित्त रामलालजी चौबे ट्रस्ट व व.वा. वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या गंधे सभागृहात शनिवारी मिलिंद ओक दिग्दर्शित ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ या  बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यास रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. 
1945 ते  1965 या काळातील गीते जितेंद्र अभ्यंकर, चेतन कुलकर्णी, अवंतिका पांडे व स्वरदा गोडबोले या गायकांनी सादर केली. तर प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आपल्या भारदस्त आवाजाने कार्यक्रमाचे निवेदन करीत उपस्थितांची मने जिंकली.
 कार्यक्रमादरम्यान राहुल सोलापूरकर यांनी प्रत्येक गीताच्या आधी संबंधित चित्रपटाविषयी माहिती दिली. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णयुगाची सुरुवात केव्हा  झाली हे सांगणे  कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलीप कुमार, देव आनंद व राज कपूर यांच्याबाबत अनेक किस्से सांगितले.