शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST

जळगाव/पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करुन गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी ...

जळगाव/पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करुन गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांच्या खंडणी घेतल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, तानाजी भोईटे, सुनील झंवर, नीलेश भोईटे, विरेंद्र भोईटे यांच्यासह २९ जणांवर सोमवारी रात्री कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ मध्ये कोथरुडमधील हॉटेल किमया व एका अपार्टमेंटमध्ये घडला. सोमवारी रात्री गुन्हा कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित यासंस्थेच्या गैरकारभारामुळे शासनाने त्यावर २०१२ मध्ये प्रशासक नेमले होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर १८ जण निवडून आले होते. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठीराख्यांचा पराभव झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादी पाटील यांना निलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगावला येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुण्याला बोलावण्यात आले. हॉटेल किमया येथे तानाजी भोईटे यांनी ही संस्था गिरीशभाऊला हवी आहे़ आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे, असे सांगितले पाटील व महेश पाटील यांनी त्यास नकार दिल्यावर निलेश भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल लावला. महाजन यांनी तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था निलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक, असे सांगितले. त्याला पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना संस्थेचे रेकॉर्ड देण्यासाठी सदाशिव पेठेत घेऊन गेले. तेथे त्यांचे हात पाय बांधून मारहाण केली. गळ्याला चाकून लावून त्यांचे कपडे काढून डांबुन ठेवले. सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर एमपीडीए च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

राजीनामे देण्यास नकार दिल्याने खंडणी स्वरुपात ५ लाख रुपये घेऊन संस्थेत कुर्‍हाडीसह प्रवेश करुन तोडफोड करुन संस्थेच्या कर्मचार्‍याच्या खिशातील ५ हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून घेऊन गेले. आरोपींनी फिर्यादी व इतराना संस्थेत जाण्यापासून मज्जाव केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

कोट...

गिरीश महाजन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्यांची भूमिका काय आहे याची पडताळणी केली जाईल . तोडफोडीचा उल्लेख फिर्यादीत असला तरी अपहरण आणि धमकी पुणे शहरात घडली. ही घटना जानेवारी २०१८ मध्ये घडली आहे. तक्रारदाराला गेल्या दोन वर्षांपासून भीती व दबाव होता आणि आता ते तक्रार देण्यासाठी पुढे आले. पुणे पोलिसांना काल रात्री जळगाव पोलिसांकडून ही आठ पानांची एफआयआर आली आहे.

-मच्छिंद्र चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त