रावेर : तालुक्यातील सुकी, आभोडा व मंगरूळ मध्यम सिंचन प्रकल्प १०० टक्के भरून ओसंडून वाहू लागल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या कोसळधार पावसात तालुक्याच्या पूर्व भागात असलेला २.९० दलघमी क्षमतेचा गंगापुरी लघुसिंचन प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्याने पूर्व भागाची जीवनवाहिनी असलेली नागोई नदी प्रवाहित झाली आहे.
मंगळवारी रावेर महसूल मंडळात सर्वाधिक ३८ मि.मी तर सावदा मंडळात किमान २८ मि.मी पावसाची नोंद झाली असून खिर्डी ३७ मि.मी, ऐनपूर ३४ मि.मी, खिरोदा प्र. यावल ३३ मि.मी, निंभोरा महसूल मंडळात ३२ मि.मी तर तालुक्यात सरासरी ३३.१४ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. आजपावेतो सरासरी ७२.४१ टक्के पर्जन्यमान तालुक्यात झाले आहे.
रावेर तालुक्यात पूर्व भागाचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नागोई नदीवर बांधलेले गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण सांडव्यावरून ओव्हरफ्लो होताना दिसत आहे. (छाया : किरण चौधरी)