शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा शोध घेत असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघे ताब्यात

By admin | Updated: January 23, 2017 20:54 IST

उशीर झाला म्हणून घरी न आलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी विवेकानंदनगरातील उद्यानाकडे गेलेल्या ४५ वर्षीय

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 23 - उशीर झाला म्हणून घरी न आलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी विवेकानंदनगरातील उद्यानाकडे गेलेल्या ४५ वर्षीय महिलेवर रविवारी रात्री पावणे बारा वाजता दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. या घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी राहूल पारसनाथ उमाप (वय २३ रा.कंजरवाडा, जळगाव) व दीपक सुभाष गायकवाड (वय २७ रा.वरणगाव, ता.भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले.पीडित महिलेचा मोठा मुलगा रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याला शोधण्यासाठी पीडित महिला विवेकानंदनगरातील उद्यानाकडे गेली असता रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास रस्त्यावर चार अनोळखी मुले थांबलेली होती. त्यांना मुलाच्या बाबतीत विचारणा केली असता तुमचा मुलगा उद्यानाकडे गेला असल्याचे सांगितले, त्यानुसार पीडित महिला तिकडे गेली असता त्यातील दोन्ही मुलांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे पायवाटेवर पीडित महिलेला ओढून तोंड दाबून दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचा ओळखीचा व्यक्ती आल्याने त्या नराधमांनी तेथून पळ काढला.लग्नासाठी आला अन् कोठडीत अडकलाझाल्याप्रकाराची माहिती पीडित महिलेने घरी पती व मुलांना दिल्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. तेथे दोन्ही संशयितांचे वर्णन सांगितले, त्यानुसार उपनिरीक्षक गिरधर निकम, भटू नेरकर, छगन तायडे, भास्कर पाटील यांनी लागलीच परिसरात संशयिंतांचा शोध घेतला असता या परिसरात लग्न असल्याने तेथे अशा वर्णनाचे तरुण असल्याचे समजले. त्यानुसार रात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी राहूल व दीपक याला ताब्यात घेतले.  दरम्यान, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दीपक हा मित्राच्या भावाच्या बहिणीच्या लग्नासाठी वरणगाव येथून आला होता. या दोघांनी रात्री मोबाईलमध्ये अश्लील क्लीप पाहिली व त्यानंतर हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.सलग दुसरी घटनाराष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर दोन विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी भुसावळात घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.