शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी अडावद येथे ग्रामपंचायतवर मोर्चा

By admin | Updated: May 15, 2017 17:59 IST

संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमतअडावद, जि. जळगाव, दि. 15 -  नळांना पाणी येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी  चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी सरपंचपतींना घेराव घालून  ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, पाटील वाडा, शिंपी गल्ली व मोमिन मोहल्यात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच दिवसांनी अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीला कळवूनदेखील कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज महिलांसह नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.पाणी प्रश्नासाठी महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला मात्र सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांचे पती सचिन महाजन यांना घेराव घालत आपल्या समस्या मांडत संताप व्यक्त केला. मोर्चा ग्रामपंचायतीवर जात असल्याचे माहित पडताच काही ग्रा.पं. सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. तब्बल तासभर ग्रामपंचायत कार्यालयात गोधळ सुरू होता. ऐनवेळी माजी पंचायत समिती सभापती शेख ताहेर मन्यार, पंचायत समिती सदस्या अमिनाबी तडवी, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत महाजन, शकिल्लोदीन शेख, चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले व सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणारप्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, मोमीन मोहल्ला, शिंपी गल्ली व पाटील वाडय़ात दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. यासाठी  तातडीची बैठक  घेणार असल्याचे आश्वासन सरपंचपती सचिन महाजन यांनी दिल्यानंतर  ग्रामस्थ व महिला माघारी परतल्या.