शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव : गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये दर महिन्याला पेट्रोलसह डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे, डिझेल ८० ...

जळगाव : गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये दर महिन्याला पेट्रोलसह डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे, डिझेल ८० रुपये लीटरच्या घरात पोहोचले आहे. यामुळे मालवाहतूक ट्रक मालकांना व्यवसाय करणे अवघड झाले असून, भाडेवाढ करायची म्हटल्यावर व्यापारी व उद्योजकांकडून कोरोनामुळे व्यवसाय मंदावल्याचे सांगत भाडेवाढ मिळत नसल्याचा सूर ट्रकचालकांमधून उपस्थित होत आहे.

जळगाव व तालुक्यातून विविध व्यापारी व लहान मोठ्या-उद्योजकांचा माल मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमध्ये जात असतो. शहरातील जवळपास दीडशे ते दोनशे ट्रक नेहमी उद्योजकांच्या मालाची वाहतूक करीत असतात. मालवाहतूक करण्यासाठी संबंधित ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडे चालक, क्लिनर व हमाल बांधव काम करीत असून, या माल वाहतुकीमध्ये जवळपासहून ५०० हून अधिक मजुरांचे हात राबत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रकमालकांना मालवाहतुकीचा व्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रकवरील कर्मचाऱ्यांचे पगार, ट्रकचे मेंटनन्स व कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ट्रकमालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, असे असताना उद्योजकांकडून मालवाहतुकीचे दर वाढविण्यास भाववाढ मिळत नसल्यामुळे हा व्यवसाय करणे अवघड जात असल्याचे ट्रकमालकांनी सांगितले.

इन्फो :

कोरोना काळात गेल्या सात ते आठ महिन्यात डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे, ट्रक मालकांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. एकीकडे डिझेलचे दर वाढले असताना, मालवाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यामुळे, व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजक-व्यापारी कोरोनामुळे व्यावसाय मंदावल्याचे सांगत, भाववाढ देत नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीत व्यवसाय करावा लागत आहे.

जसपालसिंग बग्गा, अध्यक्ष : जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन.

इन्फो :

डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ट्रक मालकांनीही मालवाहतुकीचे दर वाढविले आहेत. त्यांनी लावलेल्या दरानुसारच उद्योजकांकडून ट्रक मालकांना भाडे देण्यात येत आहे. मात्र, या सर्व प्रकारच्या दरवाढीचा फटका शेवटी ग्राहकांना बसत असून, सरकारने डिझेलचे दर आटोक्यात आणणे गरजेचे आहे.

प्रेम कोगटा, अध्यक्ष, जिल्हा दालमिल असोसिएशन.