शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट खरेदीच्या नावाखाली शेतक-याची ४१ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

जळगाव : शहरातील मुक्ताईनगरात राहणारे दिनेश रामचंद्र तिवारी (४९) यांना फ्लॅट देण्याचे सांगून पाळधी (ता.धरणगाव) येथील दाम्पत्याने सुमारे ...

जळगाव : शहरातील मुक्ताईनगरात राहणारे दिनेश रामचंद्र तिवारी (४९) यांना फ्लॅट देण्याचे सांगून पाळधी (ता.धरणगाव) येथील दाम्पत्याने सुमारे ४१ लाख १९ हजार रूपयात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगरातील एसएमआयटी महाविद्यालयाजवळील वासुकमल नंदनवन अपार्टमेंट येथे दिनेश रामचंद्र तिवारी राहतात. ते शेती करतात. दरम्यान, वासुकमल नंदनवन इमारतीतील पहिल्या मजल्यावर हरिष रामचंद्र झंवर व पुजा हरिष झंवर (रा. पाळधी, ता. धरणगाव) यांच्या मालकीचा फ्लॅट विक्रीला असल्याची माहिती तिवारी यांना एजंट बिरज जैन यांच्यामार्फत मिळाली. फ्लॅट पाहिल्यानंतर त्यांना तो आवडला. सदरील फ्लॅटवर कुठलाही बोझा नसल्याचे झंवर यांनी सांगितल्यानंतर तिवारी यांनी टोकन म्हणून ११ हजार रूपये त्यांना दिले. दरम्यान, तिवारी यांनी मालमत्ता घेताना कोणाचाही आक्षेप होवू नये म्हणून ३० सप्टेंबर २०१९ रोजी वर्तमानपत्रात नोटीस दिली. ७ ऑक्टोंबर २०१९ रोजी फ्लॅट खरेदी संदर्भात झंवर यांना सांगितले असता सौदापावती न करता तोंडी घराचा ताबा देवून खरेदीनंतर करतो, असे सांगितले. तिवारी यांनी विश्वास ठेवून झंवर यांच्या मागणीनुसार ७ ऑक्टोंबर रोजी ७ लाख ४० हजार, ९ ऑक्टोंबरला ५ लाख, १० ऑक्टोंबरला ५ लाख, ११ ऑक्टोंबरला ५ लाख तसेच १४ आॅक्टोंबरल ४ लाख, ३० नोव्हेंबर २०१९ रोजी चेकने ५ लाख व ४ लाख ४० हजार रूपये तसेच गुगल पे ने अनुक्रमे १८ हजार व २० हजार असे एकूण ४१ लाख १९ हजार रूपये दिले. दरम्यान, मे महिन्यात तिवारी यांचा अपघात झाला. त्यामुळे ते घरी होते.नंतर तिवारी यांनी फ्लॅट खरेदीचा तगादा लावल्यानंतर झंवर यांनी कागदपत्र दिली. त्यात एका बँकेचा बोझा असल्याचे दिसून आले. फ्लॅट खरेदीसाठी बोझा क्लीअर करून द्यावा असे सांगितले असता झंवर याने ८ सप्टेंबर २०२० ला तिवारी यांना नोटीस पाठविली. त्यात ६७ लाख ५१ हजार रूपये एवढी रक्कम ठरलेली असून आपण फक्त ५ लाख ३८ हजार रूपये दिल्याचे त्यात नमूद होते. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिवारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरिष झंवर व पुजा झंवर या दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.