शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा राखीव वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३०३ मध्ये मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी ...

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा राखीव वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३०३ मध्ये मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांना ६ रोजी मिळाली. त्यावर वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांनी आपल्यासोबत राम डुकरे (वनरक्षक पाटणा) व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन या ठिकाणी छापा टाकला. त्यात अरबाज याकुबखा पठाण (ब्राम्हणी गराडा, ता. कन्नड) हा गौण खनिज उत्खनन करत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या जवळील खनिजांचे १३ बॉक्स (वजन ६८ कि.‌ग्रॅ) हस्तगत करण्यात आले आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम २७, २९, ३१ व १९२७ चे कलम २६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून सोबतचे ९ जणांचा तपास सुरू आहेत. ही कारवाई विभागीय वनअधिकारी विजय सातपुते (औरंगाबाद), वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण (कन्नड) यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके (चाळीसगाव), राम डुकरे (वनरक्षक पाटणा), अजय महिरे (वनरक्षक बोढरे), वनमजूर अनिल शितोळे, राजाराम चव्हाण, मेघराज चव्हाण, गोरख राठोड, कांतीलाल नांगरे, अनिल धादवाड, नाना पवार व इतर आदींचा यात समावेश आहेत.

===Photopath===

070621\07jal_14_07062021_12.jpg

===Caption===

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा जंगलात गारगोटी चोरट्याला अटक केल्यानंतरचे छायाचित्र.