शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

जून २०२१ अखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:11 IST

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुदत संपत असून, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे ...

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुदत संपत असून, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे हे काम लांबले आहे. ३० जून २०२१ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी दिली.

जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी गेल्या वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेतर्फे नवीन उड्डाणपुल बांधण्यात येत आहे. मात्र, सुरुवातीपासूनच हे काम संथगतीने होत असल्यामुळे, मुदत संपत येत असतानाही हे काम पूर्ण झालेली नाही. पुढील वर्षी १२ फेब्रुवारी रोजी या कामाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, आतापर्यंत बीम उभारण्याचेच काम पूर्ण झाले असल्यामुळे, हे काम पूर्ण व्हायला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

इन्फो :

या कारणांमुळे कामाला विलंब झाल्याचा दावा :

- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. विविध कारणांमुळे या कामाला विलंब झाल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात येत आहे. यामध्ये कामाच्या सुरुवातीलाच रेल्वेचे `गर्डर` काढण्यासाठी पुलावर क्रेन उभी करण्यात येणार होती. त्यामुळे रेल्वेच्या सूचनेनुसार क्रेनसाठी पूल तोडण्याचे काम थांबविण्यात आले होते. तसेच गर्डर काढण्यासाठी मेगाब्लॉकची वेळ मिळत नसल्यामुळे, दोन महिने हे काम उशिराने सुरू झाले.

- त्यानंतर कामाला सुरुवात झाल्यानंतर सहाच महिन्यांत कोरोनाचा संसर्ग आला. या कोरोनामुळे शासनाच्या सूचनेनुसार मार्चपासून काम बंद होते. त्यानंतर ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात झाली. कोरोनामुळे सहा महिने हे काम थांबले असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.

- तसेच पुलाच्या बाहेरील कामासाठी मनपा पाइपलाइन व महावितरणचे खांब अडथळा ठरत आहेत. दोन वर्षांपासून हे दोन्ही अडथळे हटविण्यात न आल्यामुळे बाहेरील कामाला दिवसेंदिवस विलंब होत असून, बाहेरील काम पूर्णत : थांबले आहे. अशाप्रकारे वरील कारणांमुळे कामाला विलंब झाला असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.

कॅप टाकण्याचे काम पूर्ण :

उड्डाणपुलाच्या सध्याच्या कामाच्या प्रगतीबाबत कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले की, सध्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी पाइल्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, आता पाइल्स कॅप भरण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर गर्डर व स्लॅब टाकण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

इन्फो :

कोरोनामुळे कामाची मुदत वाढवणार

कोरोनामुळे उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेनुसार शहरात सुरू असलेल्या सर्व शासकीय कामांना सहा वाढवून देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामालाही १२ फेबुवारीला मुदत संपल्यानंतर पुढे सहा महिन्यांची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले.