शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

फैजाबाद एक्स्प्रेसचा अपघात टळला

By admin | Updated: June 21, 2017 15:26 IST

भुसावळ स्थानकात शिरण्यापूर्वीची घटना

ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.21 : 22103 मुंबई एलटीडी फैजाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसच्या साधारण डब्यातील डायनामो बेल्टमधून अचानक धूर निघाला त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. आधी धूर निघाला व नंतर आग लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांनी धाव घेऊन तातडीने उपाय योजना केल्या त्यामुळे अपघात टळला. ही घटना बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फजाबाद एक्स्प्रेस शहरातील रेल्वे दगडी पूलावर   आऊटरला थांबली असताना घडली.
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई एलटीटीहून येणारी फैजाबाद एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात येण्याआधी रेल्वे दगडी पूलाजवळ चालक गाडीला ब्रेक लावत असता या गाडीच्या साधारण श्रेणीतील डबा क्रमांक 00456 च्या पायदानाखाली असलेल्या व्हीलच्या (चाके) डायनामो बेल्टमधून अचानक धूर यायला सुरुवात झाली.त्यानंतर त्याला आग लागली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ  उडाली. दुपारची वेळ असल्याने व सर्व प्रवाशी जागी असल्याने ते गाडीच्या खाली उतरले. दरम्यान, ही घटना चालक व गार्ड यांनी तातडीने वरिष्ठाना कळविली. त्यामुळे भुसावळ स्थानकातून तातडीने संबंधित विभागाचे अधिकारी धावून आले. त्यांनी तत्काळ डायनामो बेल्ट व्यवस्थित करुन गाडीला स्थानकात आणण्यात आले. ही गाडी वेळेवर पुढे रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
फैजाबाद एक्स्प्रेसच्या साधारण डब्याचा डायनामो बेल्ट ब्रेक लावताना थोडासा हालला त्यामुळे त्यातून धूर निघाला. आग लागली नाही. यामुळे गाडीला विलंब झाला नाही. प्रवाशांची गैरसोय झाली नाही. गाडी वेळेवर सुरक्षीतपणे पुढे रवाना करण्यात आली.
- सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय   वाणिज्य व्यवस्थापक, डीआरएम कार्यालय, भुसावळ.