शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्ती न केल्याने भुयारी गटारीच्या बुजलेल्या चाऱ्या ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST

मनपानेही केली नाही दुरुस्ती : चाऱ्यांमध्ये घसरून अनेकजण होताहेत जखमी ; पावसाळ्यातील व्यथा कायम रिॲलिटी चेक- अजय पाटील लोकमत ...

मनपानेही केली नाही दुरुस्ती : चाऱ्यांमध्ये घसरून अनेकजण होताहेत जखमी ; पावसाळ्यातील व्यथा कायम

रिॲलिटी चेक- अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या बिकट होत जात असून, महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतरदेखील जळगावकरांना खराब रस्त्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच भुयारी गटार योजनेतंर्गत अंतर्गत रस्त्याचा मधोमध खोदलेल्या चाऱ्या मनपाने वेळेवर दुरुस्त न केल्यामुळे या चाऱ्या वाहनधारकांसाठी धोकेदायक ठरत आहेत. या चाऱ्यांमध्ये अनेक वाहने घसरत असल्याने शहरात लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. या चाऱ्या आता धोकादायक ठरत असून, मनपाच्या ढिसाळ कामकाजाचा फटका जळगावकरांना सहन करावा लागत आहे.

अमृत अंतर्गत शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. पाणी पुरवठा योजनेप्रमाणे पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते, नंतर दुरुस्त करण्याची जबाबदारी ही मक्तेदारावर न ठेवता मनपाकडेच घेतली होती. निविदा प्रक्रियेत मनपा अभियंत्यानी केलेल्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता जळगावकरांना बसत आहे. कारण, जळगाव शहरात भुयारी गटार योजनेतंर्गत सुमारे २०० किमीचे रस्ते फोडण्यात आले असून, त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे हेच रस्ते पावसाळ्यात जळगावकरांसाठी धोकेदायक ठरत आहेत.

आर. आर. विद्यालय परिसर

स्टेडियम कॉम्प्लेक्सकडून आर. आर. विद्यालयाकडे जाणारा रस्ता अगदी मधोमध खोदण्यात आला होता. हा रस्ता खोदल्यानंतर ठेकेदाराकडून माती टाकून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र, आता पावसामुळे ही माती रस्त्यावर पसरली असून, चारीदेखील मुख्य रस्त्यापासून खाली सरकली आहे. यामुळे वाहन चालविताना वाहन जर चारीमध्ये गेले तर वाहनधारक घसरण्याची शक्यता अधिक असते. तसेच आतापर्यंत या रस्त्यावर पाऊस झाल्यानंतर दररोज अनेक वाहनधारक घसरून पडत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक पाऊस झाल्यानंतर या रस्त्याने जाणे टाळत आहेत.

भजे गल्लीत जाताहात तर सावधान..

भजे गल्लीत तर सिमेंटचा रस्ता अगदी मधोमध फोडून टाकला आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांपासून हा रस्ता काही सेंमी खाली सरकला आहे. तसेच या रस्त्यावर वर्दळदेखील मोठ्या प्रमाणात राहत असल्याने या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. तसेच रस्त्याचा एका बाजूला हॉकर्सने आपली दुकाने थाटलेली असल्यामुळे वाहनधारकांना चाऱ्यामधूनच वाहने चालविण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे याठिकाणी अपघातांची संख्यादेखील अधिक आहे.

या भागातही हीच परिस्थिती

मुख्य बाजारपेठ परिसरासह शहरातील चित्रा चौक, पोलन पेठ, बालगंधर्व नाट्यगृह परिसर, शिवाजी नगर, आर्किड रुग्णालय परिसर, सुभाष चौक, नेहरू चौक परिसर, शनिपेठ परिसर, जुना कापड बाजार, बळीराम पेठ या भागांमध्ये देखील हीच समस्या कायम असून, पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर वाहने चालविणे म्हणजे एखादा धोका पत्करण्यासारखेच आहे.

कानळदा रस्त्यापेक्षा गावातील शेतरस्ता बरा

केसी पार्क ते एस के ऑईल मिल रस्त्यादरम्यानदेखील भुयारी गटार योजनेचे काम झाले आहे. या रस्त्याची परिस्थिती आधीच खराब होती. त्यातच रस्ता खोदल्यामुळे या ठिकाणी रस्तादेखील आता शिल्लक राहिलेला नाही. एखाद्या गावातील शेतरस्ता तरी चांगला म्हणावा अशी परिस्थिती कानळदा रस्त्याची झाली आहे. रस्त्याचा त्रास होत असल्याने अनेक वाहनधारक फुपनगरी फाट्यापासून ममुराबादमार्गे तब्बल पाच किमीचा फेरा टाकून येणे पसंत केले आहे.

मुरूम टाकला असता तरी वाचला असता त्रास

मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रभागनिहाय ५० लाख याप्रमाणे एकूण ९ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, या निधीपैकी ठराविकच प्रभागांमधून काम पूर्ण झाले. तर इतर प्रभागांमध्ये निधी मंजूर होऊनदेखील ठेकेदारांनी काम करायला नकार दिल्यामुळे काम होऊच शकले नाही. मनपा प्रशासनाने जर या चाऱ्यांमध्ये मुरूमदेखील टाकला असता तरी या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा तरी मिळू शकला असता. मात्र, मनपाच्या ढिसाळ कामांचा फटका नागरिकांना बसत आहे.