शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन तिकीटांचा काळाबाजार उघड

By admin | Updated: February 17, 2017 22:38 IST

आॅनलाइन तिकीटांचे बुकींग करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या शहरातील आरपीडी रोडवरील स्टार सिटी आॅनलाईन सर्व्हिसेसच्या मो. हुसेन शेर मोहम्मद (वय २८, भुसावळ) यास अटक करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि.17 - आॅनलाइन तिकीटांचे बुकींग करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या शहरातील आरपीडी रोडवरील स्टार सिटी आॅनलाईन सर्व्हिसेसच्या मो. हुसेन शेर मोहम्मद (वय २८, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीकडून सुमारे २५ हजारांची आरक्षित तिकीटे जप्त करण्यात आली.मुंबईच्या मुख्य सतर्कता पथकाने (व्हिजिलन्स) स्थानिक आरपीएफ व आरपीएफ गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली़ या कारवाईने तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.मुंबईचे मुख्य सतर्कता निरीक्षक अतुल धीरसागर यांना प्राप्त झालेल्या तक्रारी व गुप्त माहितीनंतर शुक्रवारी रात्री सापळा रचण्यात आला़ आरपीएफ निरीक्षक व्हीक़े़लांजीवार, आरपीएफ गुन्हे शोध शाखेचे अतुल टोके यांच्या मदतीने आरोपीच्या आरपीडी रोडवरील स्टार सिटी आॅनलाईन सर्विसेसवर धाड टाकून संगणक व मुंबई, उत्तर प्रदेशासह बिहारातील विविध ठिकाणांची स्लीपर व वातानुकूलित डब्यातील सुमारे २५ हजारांची १५ तिकीटे जप्त करण्यात आली़ आरोपी आपल्याच नावाने तिकीटे बुक करून त्याची तिकीटाच्या डबल भावाने विक्री करीत असल्याची तक्रार पथकाला होती. रेल्वे कायदा कलम १४३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. एका मिनिटात रिझर्वेशनसूत्रांच्या माहितीनुसार आरोपी संगणकात विशिष्ट सॉप्टवेअर वापरून आॅनलाईने तिकीटे बुक करायचा त्यामुळे एका मिनिटात त्याला आरक्षित तिकीट उपलब्ध व्हायचे़ विविध गाड्यांना नेहमीच असणाऱ्या हाऊसफुल्ल रिझर्वेशनमुळे पथकाने लक्ष केंद्रीत करून कारवाई केली.

आयपी अ‍ॅड्रेस ट्रेसव्हिजिलन्सने आरोपीच्या संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस तज्ज्ञांकडून ट्रेस करीत भुसावळ गाठत आरोपीला अटक केली़ संगणक हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून त्यातून अनेक गुपिते बाहेर पडणार आहेत़ केवळ भुसावळच नव्हे ठिकठिकाणी आॅनलाईन तिकीटांची काळाबाजारी करणारे व्हिजिलन्सच्या रडारवर असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.