शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात ; खोलीतून दोन मोबाइल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:15 IST

जळगाव : खोलीचा दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून या उघड्या घरातून चोरट्याने दोन महागडे मोबाइल लांबविल्याची ...

जळगाव : खोलीचा दरवाजा उघडा ठेवणे तरुणांना चांगलेच महागात पडले असून या उघड्या घरातून चोरट्याने दोन महागडे मोबाइल लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी प्रताप नगरात उघड झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रताप नगरात हितेश देवीदास भदाणे, श्याम युवराज राठोड व कार्तिक मराठे हे तिघे मित्र एकाच खोलीत भाड्याने राहतात. नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे श्याम हा दरवाजा उघडा ठेवून मॉर्निंग वाॅकसाठी निघून गेला. त्यानंतर ६.३० वाजेच्या सुमारास तो खोलीवर परतला. त्यावेळी हितेश याला जाग आली. किती वाजले हे पाहण्यासाठी त्याने मोबाइलचा शोध घेतला. पण, तो मिळून आला नाही. स्वत:च्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी हितेश मित्र कार्तिक याचा मोबाइल शाेधू लागला. मात्र, त्याचाही मोबाइल मिळून आला नाही. अखेर श्याम राठाेड याच्या मोबाइलवर दोन्ही मोबाइलवर संपर्क साधला असता, दोन्ही मोबाइल बंद आढळून आले. अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडा असल्याची संधी साधत मोबाइल लांबविल्यामुळे शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठत त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.