शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराच्या रकमेबाबत आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेतील अपहार प्रकरणात अटक केलेला एजंट संदीप प्रभाकर सावळे ...

जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेतील अपहार प्रकरणात अटक केलेला एजंट संदीप प्रभाकर सावळे (वय ३६, रा.भुसावळ) याने आधी अटक केलेल्या संजीव वसंत सोनवणे याच्याकडून अपहाराची १ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम घेतलेली आहे. या रकमेची विल्हेवाट कशी लावली, यात आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती पाहता सावळे याला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जून रोजी सावळे याला भुसावळातून अटक केली होती. रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते. सावळे याचे महामंडळात स्वत:च्या नावाने एक प्रकरण असल्याचे उघड झाले आहे. आधी अटक केलेला संजीव सोनवणे याने त्याने त्याच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम ही संदीप सावळे याच्या भुसावळ येथील कॉसमॉस बँकेच्या खात्यात ६ लाख ५७ हजार रुपये इतकी आरटीजीएस या प्रणालीद्वारे वळवली आहे. संजीव सोनवणे याला अटक झाली तेव्हापासून सावळे हा फरार झालेला होता. पोलिसांनी त्याच्या भुसावळ येथील घरी अनेक वेळा छापा टाकला असता तो मिळून आलेला नव्हता. त्याच्यासोबत आणखी काही साथीदार आहेत. सोनवणे याच्या बँक खात्यावर आलेली एक कोटी ३ लाख रुपये ही रक्कम सावळे याला दिलेली असून, त्याच्याप्रमाणे इतरांनीही सावळे याला रक्कम दिल्याचा संशय आहे.

१२ जणांच्या खात्यात वर्ग केली रक्कम

संदीप सावळे याने अपहाराची रक्कम १० ते १२ जणांच्या बँक खात्यांत वर्ग करून घेतली असून, या लोकांनीही इतरांच्या खात्यांत वर्ग करून नंतर काढली आहे, या लोकांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, सावळे याने शिव कॉलनीतील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस खाते उघडले असून, त्यातही अपहाराची रक्कम वर्ग करून ती रक्कम काढली व नंतर हे बँक खातेच बंद केले. कोणाकोणाच्या नावाने त्याने अशी बोगस खाती उघडली आहेत, याची माहिती संकलित केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.