कुजबुज- आकाश नेवे, अपेक्षित स्टार ३
सध्या बदल्यांचा मोसम सुरू आहे. परजिल्ह्यातून एक अधिकारी जळगावला आले. त्यांच्या बदलीने जिल्हाधिकारी कार्यालयात घोळका करून आलेल्यांना बुधवारी चांगलेच भरते आले होते. अधिकारी रुजू झाले. मात्र त्यासोबत त्यांना तात्पुरता का होईना, पण जो मलिदाखाऊ विभाग मिळु शकणार होता. तो मिळाला नाही. त्यामुळे ज्यांच्या आनंदाला बुधवारी उधाण आले होते. त्या आनंदावर गुरूवारी सकाळीच विरजण पडले. त्यामुळे निराश झालेल्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातील एकाने तर जाऊ द्या यार.. अपना तो ‘बॅडलक’भी खराब चल रहा है अशी कमेंट केली. आधीच पावसाने नदी तुडूंब भरली आहे. त्यात लपवलेला माल बाहेर काढून विक्रीची काही दिवसांसाठी का होईना सोय होणार होती. पण ते देखील झाले नाही, म्हणत मंडळी चहाच्या टपरीकडे रवाना झाली.