शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतरही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असताना, दोन ...

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असताना, दोन वर्षांपासून जळगाव ते पाचोरा दरम्यानही हाती घेण्यात आले. हाती घेण्यात आलेले तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम मात्र अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे दोन वर्षे उलटूनही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पाही पूर्ण झाला नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनातर्फे सध्या या ठिकाणी फक्त रूळ टाकण्यात आले असून, विद्युतीकरणासह सिग्नल यंत्रणेचे काम बाकी आहे. दोन वर्षांच्या मुदतीत हा मार्ग पूर्ण न झाल्यामुळे, हे काम आता कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या चार वर्षांपासून भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दोन वर्षांत भुसावळ ते भादली दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला तर त्यानंतरच्या दोन ‌‌‌‌‌वर्षांत भादली ते जळगाव दरम्यान दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला. एकूण २४ किलोमीटरचा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा टप्पा पूर्ण झाला असून, येत्या १५ ऑगस्टपासून या मार्गावरून रेल्वेही धावणार आहे. मात्र, ज्या वेगाने आणि दिलेल्या वेळात रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम केले. त्या वेगाने जळगाव ते शिरसोली दरम्यान तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे अधूनमधून अनेकदा हे काम रखडले असताना, दुसरीकडे कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर, रेल्वेतर्फे वेळेवर काम सुरू न करण्यात आल्यामुळे निश्चित वेळेत शिरसोलीपर्यंतचा टप्पा पूर्ण झालेला नाही.

इन्फो :

विद्युतीकरणासह सिग्नल यंत्रणेचेही काम बाकी :

रेल्वे प्रशासनातर्फे खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून हे काम करण्यात येत असून, जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेटपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडथळा वगळता शिरसोलीपर्यंत जमिनीचे सपाटीकरण करून लोखंडी रूळही टाकण्यात आले आहेत. परंतु, विद्युतीकरण व सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम अद्यापही बाकी आहे. ही यंत्रणा उभारल्यावरच या मार्गावरून रेल्वे धावणार आहे.

इन्फो :

शिरसोलीच्या पुढे सपाटीकरणाचे काम सुरू :

रेल्वे प्रशासनातर्फे जळगावातून सुरू केलेला शिरसोलीपर्यंतचा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा वे‌ेळेत पूर्ण न झाल्यामुळे, पुढचा टप्पा वेळेत पूर्ण करण्यासाठी शिरसोलीपासून पुढे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी सपाटीकरण, भुयारी बोगदे व पूल उभारण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीदेखील हे काम सुरू आहे.

इन्फो :

कोरोनामुळे मधल्या काळात अनेकदा तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे शिरसोलीपर्यंतच्या टप्प्याला विलंब होत आहे. सध्या या ठिकाणी कामाला सुरुवात झाली असून, लवकरच हे पूर्ण करण्यात येणार आहे.

- पंकज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग