शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यानंतरही शिव कॉलनी पुलाला मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र नंतर परिसरातील नागरिकांच्या मागणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये चेंज ऑफ स्कोपमध्ये या कामाचा प्रस्ताव नागपूरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला. याला आठ महिने उलटले तरी अद्याप या उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि महामार्गावरील नेहमीच होणारे अपघात पाहता शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली. या रस्त्यावर सर्वात धोकादायक चौक म्हणजे शिव कॉलनी आहे. येथे पोलिसांनीही अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट घोषित केला आहे. तरीही चौपदरीकरणाच्या मुळ आराखड्यात शिवकॉलनीतील उड्डाणपुलाला ‌वगळण्यात आले होते. नंतर खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी करून येथे उड्डाणपुल किंवा भुयारी मार्गाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाच्या सल्लागाराकडे नागपूरला पाठवले. मात्र मे २०२१ उजाडला तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कामगार परतायला सुरूवात

लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले परप्रांतीय कामगार आता पुन्हा परत यायला सुरूवात झाली आहे. जेव्हा जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तेव्हा या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे फक्त १६ कामगार आणि ७ कर्मचारी शिल्लक राहिले होते. मात्र नंतर हळु हळु कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता बरेच जण पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. आता पुन्हा कामाला वेग मिळणार असला तरी पावसाळ्यामुळे पुन्हा किती काम होते, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक सुजितकुमार सिंग यांनी सांगितले की,‘ लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कर्मचारी आता परत येत आहेत. मात्र आता पावसामुळे पुन्हा एकदा कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. जेथे पाणी असेल तेथे काम करता येणार नाही.’