गाढोदा गावातील जुने राजकारणी गोपाल पाटील व रामचंद्र पाटील हे दोघेही सध्या एकाच पक्षात असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा दोन पॅनलमध्ये नेहमीप्रमाणे अटीतटीची लढाई होईल किंवा नाही, त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. अपेक्षेनुसार पारंपरिक प्रतिस्पर्धींमधील दिलजमाईमुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील नेहमीची चुरस सुरुवातीच्या काळात दिसतही नव्हती. परंतु, नामनिर्देशन पत्रे भरण्याच्या तारखेपर्यंत दोन्ही नेत्यांमधील समर्थकांच्या गटात कोणाच्या वाट्यावर किती जागा द्यायच्या, या मुद्द्यावरून मतभेद कायम राहिले. शेवटी कोणतीच तडजोड न झाल्याने दोन पॅनलमध्ये विभागणी होऊन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. गोपाल पाटील यांचे पुतणे योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील व रामचंद्र पाटील यांचे पुतणे पद्माकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये त्यामुळे आता सरळ लढत रंगली आहे. याशिवाय अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवर भरत सुकदेव सपकाळे यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे तीन महिला उमेदवारांनी प्रत्येकी दोन वॉर्डात उमेदवारी दाखल केली आहे.
----------------
वॉर्डनिहाय लढती (कंसात आरक्षण)
वार्ड १:
अरुणाबाई जगन्नाथ पाटील- आशा योगेश पाटील (सर्वसाधारण महिला)
विमलबाई गोकूळ पाटील-विजयाबाई राजेंद्र पाटील (सर्वसाधारण महिला)
शिवाजी देवराम पाटील-अरुण गोरख पाटील (सर्वसाधारण पुरुष)
वॉर्ड २:
बुगाबाई उत्तम गायकवाड- विनोद बापू मोरे (अनु.जमाती)
जयश्री पद्माकर पाटील- मीराबाई नरहर पाटील (नामाप्र महिला)
अरुणाबाई जगन्नाथ पाटील-आशा योगेश पाटील (सर्वसाधारण महिला)
वॉर्ड 3:
सुरेश रामसिंग सपकाळे- समिंदर भास्कर सपकाळे (अनु.जाती)
बाळू प्रेमराज पाटील- योगेश रमण पाटील (नामाप्र)
विमलबाई गोकूळ पाटील- माधुरी गजानन पाटील (सर्वसाधारण महिला)