शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवरून कोरोनाबाधित प्रवाशाचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:20 IST

जळगाव : अहमदाबादहून नवजीवन एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशाचा अँटिजेन चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगताच या प्रवाशाने रुग्णालयात दाखल न होता ...

जळगाव : अहमदाबादहून नवजीवन एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशाचा अँटिजेन चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगताच या प्रवाशाने रुग्णालयात दाखल न होता स्टेशनवरून थेट घराकडे पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी घडला. दरम्यान, अँटिजेन चाचणी केंद्रावर सुरक्षिततेसाठी जीआरपी अथवा रेल्वे पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त नसल्यामुळेच या तरुणाला पलायन करता आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे हा तरुण पळून जात असताना, जीआरपीचे पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे होते. मात्र त्यांनीही कोरोनाच्या भीतीने त्या तरुणाला पकडले नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जळगाव रेल्वे स्टेशनवर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकातर्फे परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच हे पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक प्रवाशाची या ठिकाणी नोंद करण्यात येत आहे. शहरातील जोशी पेठेत राहणाऱ्या या तरुणाने मला कुठलाही कोरोना झालेला नाही. मी ठणठणीत आहे, असे सांगून स्टेशनवरून पळण्यास सुरुवात केली. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला अडविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरुणाने काहीएक न ऐकता घराकडे पलायन केले. आता यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.