शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलच्या दलालाने व्यापाऱ्याची पाच ट्रक साखर परस्पर विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

जळगाव : एरंडोल येथील मनोज मानुधने या दलालाने जामनेर येथील व्यापारी प्रकाशचंद हुकुमचंद ओसवाल यांच्या नावाने साखर कारखान्यातून पाच ...

जळगाव : एरंडोल येथील मनोज मानुधने या दलालाने जामनेर येथील व्यापारी प्रकाशचंद हुकुमचंद ओसवाल यांच्या नावाने साखर कारखान्यातून पाच ट्रक साखर मागवून त्याची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानुधनेविरुध्द बारामती पोलीस ठाण्यात ७ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मंजुश्री महेश करवा (वय ३६,रा. फलटण, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. मंजुश्री यांचे पती महेश कांतीलाल करवा हे गणपती एन्टरप्रायजेस या नावाने साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय असून फर्म मंजुश्री यांच्या नावाने आहे. एरंडोल येथील मनोज मानुधने याच्याशी २०२० पासून ओळख होती. जामनेर येथील व्यापारी प्रकाशचंद हुकुमचंद ओसवाल यांच्या माध्यमातून व्यवहार केला जात होता. मानुधने याने मागविलेल्या साखरेचे पेमेंट ओसवाल यांच्या बँक खात्यातूनच करवा यांच्या फर्मच्या नावाने असलेल्या खात्यात जमा होत होते. १२ जून २०२१ रोजी मानुधने याने करवा यांच्याशी संपर्क करुन माझा ट्रक माळेगाव, बारामतीला आलेला आहे १५० क्विंटल साखर आजच्या आज पाठवू शकता का? म्हणून विचारणा केली असता त्यावर करवा यांनी आजच निविदा खुली झाली असल्याचे सांगितले, त्यावर तुम्ही साखर पाठवा व कारखान्याला पेमेंट करा असे सांगितल्याने करवा ३११० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे १५० क्विंटलचे ४ लाख ९० हजार ३१५ रुपयांचे बील ट्रक सोबतच पाठविले.

संगमनेर व भेंडा कारखान्यातून चार ट्रक साखर पाठविली

त्यानंतर २८ मे २०२१ व १० जून २०२१ रोजी संगमनेर साखर कारखाना, त्यानंतर परत १० जून व १२ जून रोजी भेंडा साखर कारखाना, अहमदनगर येथून प्रत्येकी दोन असे ४ ट्रकमध्ये ७७० क्विंटल साखर ओसवाल यांना पाठविल्या. १५ दिवसांनी पेमेंटबाबत मानुधने याच्याकडे विचारणा केली असता मला काही दिवस मुदत द्या, समोरील व्यक्तीला पेमेंटची अडचण असल्याचे करवा यांना सांगितले. काही दिवसांनी परत करवा याना त्याच्याशी संपर्क केला असता टाळाटाळ होऊ लागली, त्यामुळे त्यांनी ओसवाल यांच्याशीच संपर्क साधला असता तुम्ही पाठविलेली साखर मला मिळालेलीच नाही, ज्याने ऑर्डर दिली त्याच्याकडे चौकशी करा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे करवा यांनी पुन्हा मानुधने याच्याशी संपर्क केला असता त्याच्याकडून टाळाटाळ व शिवीगाळ होऊ लागली.

स्टॅम्प पेपरवर घेतल्या धमकावून सह्या

करवा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २ जुलै रोजी करवा हे भाऊ विजय, आई किरण, मदनलाल करवा असे पुन्हा आई व इतर नातेवाईकांना घेऊन एरंडोल येथे आले असता मानुधने याने पैशाची जुळवाजुळव करतो म्हणून थांबवून ठेवले. जळगावला पैशासाठी जात असल्याचे सांगून सोबत करवा यांच्या आई व काकू यांनाही गाडीत फिरविले. नंतर सायंकाळी सोबत एका व्यक्तीला आणले, त्याच्याजवळ सुरा होता, पैसे मागितले तर इथेच संपवितो असा दम देऊन मदनलाल यांना मारहाण केली. त्यानंतर आधीच काही तरी मजकूर टाईप करुन आणलेल्या स्टॅम्पपेपरवर सह्या घेतल्या, असेही करवा यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

कोट..

एरंडोल येथील एका जणाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अजून तरी या गुन्ह्यात संशयित व्यक्तीला अटक झालेली नाही. लवकरच अटकेची कारवाई केली जाईल.

-योगेश लंगुरे, तपासाधिकारी, बारामती पोलीस ठाणे