यावेळी मूर्तिकार रवींद्र नवल कोळी यांच्यासोबत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याचा आनंद घेतला. सकाळी येताना विद्यार्थ्यांनी घरून शाडू माती, छोटी घमेली, मग, कापडाचा तुकडा सोबत आणला. शालेय ताणतणावातून मुक्त होत आनंदाने माती कालवून मूर्ती बनविल्या. हरितसेना शिक्षकांनी सर्वांकडून याच मूर्ती घरी स्थापन करून, घरासमोर टफमध्ये विसर्जन करण्याचा व आपल्या गावात व परिसरात याचा प्रचार करण्याचा संकल्प करून घेतला. सहभागी विद्यार्थ्यांनी मूर्ती पूर्ण केल्यानंतर घरी मूर्ती सुकविल्यानंतर रंगविलेल्या सुंदर, सुबक व आकर्षक मूर्तीचा फोटो हरितसेना विभागाकडे पाठविण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या वतीने पहिल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर केलेे. सोबत प्रोत्साहनपर बक्षिसे एस.एस. पाटील, एस.सी. पाटील, दीपक पाटील यांच्याकडूनही जाहीर करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बी.एस. महाजन, शाळेचे चेअरमन सुखदेवराव पाटील, शालेय समिती सदस्य वामनराव महाजन, बाजीराव पाटील, प्रदीप महाजन, उपमुख्याध्यापक एम.एफ. पाटील, पर्यवेक्षक के.पी. बडगुजर, एस.पी. महाजन, एन.पी. महाजन, आर.बी. साळुंके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
धानोरा विद्यालयात राबविला पर्यावरण पूरक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST