शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सपाटीकरणावर पुन्हा अतिक्रमण

By admin | Updated: January 4, 2017 00:41 IST

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले.

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र त्यानंतर पुढची कार्यवाही न झाल्याने अतिक्रमणधारकांची सोय झाली आहे. काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने वेळेत कार्यवाही न झाल्यास कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे.सिमांकनाचे काम रखडलेराष्ट्रीय महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी तालुका भूमीअभिलेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांचे संयुक्त पथक नियुक्त करून सिमांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र या मार्गाच्या भूसंपादनाचे अभिलेख मिळत नसल्याने सिमांकनाचे काम रखडले आहे.सपाटीकरणामुळे अतिक्रमण वाढलेराष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यावर बांधकाम मटेरियल तसेच वाढीव झाडे व झुडपे असल्याने महापालिकेने सामाजिक संस्था तसेच उद्योजकांना आवाहन केले होते. त्यानुसार जैन उद्योग समुहाने जेसीबी व डंपरच्या साहाय्याने शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, आय.टी.आय या भागातील समांतर रस्त्याचे सपाटीकरण केले. मात्र महापालिकेने सपाटीकरणानंतर कोणतीही कार्यवाही न केल्याने या रस्त्यावर खुर्च्या, सोफा, मटके तसेच साहित्य विक्री करणाºया नागरिकांनी अतिक्रमण करीत नव्याने दुकाने थाटली आहेत.काटेरी झुडपे काढण्याची गरजमहामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यावर सपाटीकरण केल्यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या वाढीव काटेरी झुडपे तसेच नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने आपल्या सफाई कर्मचाºयांच्या मदतीने ही मोहिम राबविणे आवश्यक आहे. बांभोरी पुलापासून ते खोटेनगरपर्यंत बहुतांश काटेरी झुडपे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. याकडे नेहमी दुर्लक्षच होत असते. संघटनांच्या सहभागाची आवश्यकतामहापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाने समांतर रस्त्यांच्या सपाटीकरणाला सुरुवात केली      आहे. मात्र गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते खोटेनगरपर्यंत दोन्ही बाजूला पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा सार्वधिक धोका असतो. औद्योगिक वसाहत भागातील उद्योजक तसेच शहरातील सामाजिक व सेवाभावी संघटनांनी पुढे येऊन या समस्या दूर करण्याचीच आवश्यकता असल्याच्या अपेक्षा आता शहरातील नागरिकांकडून केल्या जात असून यामुळे मोठी समस्या दूर होणार असल्याचे बोलले जात      आहे.